- श्रावणी बॅनर्जी
छत्री ही यापूर्वीच्या पिढय़ांसाठी एक गरज होती, एक पावसाळी गरज! आज तशी स्थिती नाही. सध्या एक नवीनच ट्रेण्ड चर्चेत आहे. त्याचं नाव आहे, ‘युवर अम्ब्रेला इज युवर मान्सून स्टेटमेण्ट’. एक काळी छत्री घेतली, निघाले पावसात हा जमाना आता जुना झालाय! हा नवीन ट्रेण्ड म्हणतोय की, तुम्ही पावसालाच नव्हे, तर मान्सूनला कुठल्या वृत्तीनं सामोरे जाता हेच तुमची छत्री सांगते. त्यामुळे छत्री ही नुस्ती फॅशन नाही, तर तुमचं मान्सून स्टेटमेण्ट आहे.
मनावरची मरगळ उतरवून पावसाकडे, त्यातल्या रोमान्सकडे तुम्ही कसं पाहता हे सांगणारी एक वृत्ती आहे.
कुणी म्हणेल की, काहीही काय, छत्रीचा आणि पावसाळी मानसिकतेचा काय संबंध?
पण हा नवा तरुण ट्रेण्ड म्हणतोय की, हा संबंध आहे. कारण अनेकजण पावसाकडे वैताग, रिपरिप, चिखल, राबडी, राडा म्हणून पाहतात.
काही जणांना पाऊस म्हटलं की नुस्त्या कविताच आठवतात.
काही जणांना फक्त पावसाळी ट्रेक आठवतात.
काहीजण उठतात आणि चहाभजी पाटर्य़ा करतात.
आणि काहीजण पाऊस पडायला लागला की, चहा-कॉफीचा मग घेऊन फक्त गाणी ऐकत बसतात.
काहीजण फक्त पुस्तकं वाचतात.
जो तो पावसाला आपापल्या वृत्तीप्रमाणे आणि मूडप्रमाणे रिअॅक्शन देत असतो.
आणि त्या रिअॅक्शन देण्याचं एक प्रतीक असतं आपली छत्री!
तुमची छत्री किती रंगीली आहे यावरून सहज तुमची वृत्ती ओळखता येऊ शकते.
ट्रेकला जाणारा रेनकोटच घेतो, छत्रीच्या मागे लागत नाही.
नाजूकसाजूक मुली नाजूक छत्र्या घेतात, तर रांगडे, बेफिकीर गडी छत्री चुकूनसुद्धा घेत नाहीत.
काहीजण स्वतर् छत्री आणत नाहीत, कायम इतरांच्या छत्रीत घुसतात.
आपल्या अवतीभोवती पाहा, अशा अनेक वृत्ती दिसतील.
आणि तुमच्या स्वतर्च्याही छत्रीकडे पाहा.
तुमची पावसाला असलेली रिअॅक्शनही सहज दिसेल!
ती वाचा आणि म्हणा, धीस इज माय मान्सून स्टेटमेण्ट!!