Ind vs Ban: लेकाचा पहिला ODI सामना, पण कुलदीपचे वडिल सलूनमध्येच करत होते काम

मध्ये प्रदेशच्या रिवा येथील कुलदीप सेनने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियात एंट्री केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात कुलदीपने २ विकेट्ही घेतल्या. मात्र, त्याचा हा सामना त्याच्या वडिलांना पाहता आला नाही.

मध्ये प्रदेशच्या रिवा येथील कुलदीप सेनने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियात एंट्री केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात कुलदीपने २ विकेट्ही घेतल्या. मात्र, त्याचा हा सामना त्याच्या वडिलांना पाहता आला नाही.

कुलदीप सेनचे वडिल आजही त्याच्या गावात हेअर कटींग सलूनचे दुकान चालवतात. कालच्या सामन्यावेळीही ते दुकानात लोकांचे केस कापण्याच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना लेकाचा ओडीआय डेब्यु सामना पाहत आलाच नाही.

कुलदीपचे वडिल रामपाल यांनी सामना झाल्यानंतर दैनिक भास्करशी बोलताना भावूक प्रतिक्रिया दिली. दुकानात माझ्याकडे टीव्ही किंवा मोबाईल नाही, त्यामुळे, मी सामना पाहू शकलो नाही. आता, घरी गेल्यानंतरच त्याचा खेळ कसा झाला याची माहिती घेईल, असे रामपाल यांनी म्हटले होते.

माझा मुलगा भारतीय संघात खेळतोय ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. एवढ्या लहानशा गावातून जाऊन तो आज भारतीय संघात खेळतोय, असेही वडिल रामपाल यांनी म्हटलं आहे.

कुलदीप हा स्टेट क्रिकेट खेळतोय हे त्याच्या वडिलांना अनेक दिवस माहिती नव्हतं. एकवेळी, त्याला राज्यस्तरीय क्रिकेट खेळण्यास जाण्यासाठी ५०० रुपये हवे होते, त्यावेळी, कुलदीपच्या आईने वडिलांकडे पैसे मागितले, तेव्हा त्यांना याबाबत माहिती दिली होती.

२२ ऑक्टोबर १९९६ साली मध्य प्रदेशमधील हरिहरपूर गावात कुलदीपचा जन्म झाला. त्याचे वडील आजही सलूनमध्ये काम करतात, तर ८ वर्षांपासून कुलदीपने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून कुलदीप खेळतो. १ नोव्हेंबर २०१८ मध्ये मध्य प्रदेश संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. २१ नोव्हेंबर २०१८मध्ये त्याने पंजाबविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या.

स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून कुलदीप खेळतो. १ नोव्हेंबर २०१८ मध्ये मध्य प्रदेश संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. २१ नोव्हेंबर २०१८मध्ये त्याने पंजाबविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या.

त्यानंतर सय्यद मुश्ताक आली आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही त्याने आपला दम दाखवला. न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत तो भारत अ संघाचा सदस्य होता.

आयपीएलची कामगिरी आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सने २० लाखांत कुलदीपला आपल्या संघात घेतले. येथे, त्याने ७ सामन्यांत ८ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

दरम्यान, बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या ओडीआय सामन्यासाठी कुलदीपची निवड झाल्यानंतर त्याच्या मित्र परिवाराने आनंद व्यक्त केला. तर, टिम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याचे संघात स्वागत केले.