Photo : क्रीडा मंत्र्यांनी भर मैदानात जिच्यासाठी दाखवले 'Love Letter', ती Susmita Roy देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर!

Manoj Tiwari, Ranji Trophy 2022 : रणजी करंडक स्पर्धेत पुन्हा एकदा क्रीडा मंत्री मनोज तिवारी ( Manoj Tiwari) ची चर्चा रंगली.

Manoj Tiwari, Ranji Trophy 2022 : रणजी करंडक स्पर्धेत पुन्हा एकदा क्रीडा मंत्री मनोज तिवारी ( Manoj Tiwari) ची चर्चा रंगली. मध्य प्रदेशविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या फलंदाजाने आणखी एक शतक झळकावले.

पण, शतकी सेलिब्रेशन करताना मनोज तिवारीने खिशातून एक पत्र काढलं अन् त्यात कुटुबियांसाठी Love असे लिहिले होते. त्यात सर्वात वर Susmita असे लिहिले होते.

बंगालची अवस्था ५ बाद ५४ अशी झाली असताना मनोज तिवारी व शाहबाज अहमद ( Shahbaz Ahmed) यांनी वैयक्तिक शतक झळकावले. तिवारी व शाहबाज यांनी सहाव्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी केली. मनोजने २११ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. शाहबाजने २०९ चेंडूंत १२ चौकारांसह ११६ धावा केल्या. ही दोघं माघारी परतल्यानंतर बंगालचा डाव गडगडला. त्यांनी २७३ धावा केल्या.

मनोज तिवारीने भारताकडून १२ वन डे आणि ३ ट्वेंटी- २० सामने खेळले आहेत. त्याला २०१५ नंतर भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आता तो पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री आहे.

सुष्मिता ही मनोज तिवारी याची पत्नी आहे. सुष्मिता सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसली तरी, ती सोशल मीडियावर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देऊ शकते.

मनोज व सुष्मिता यांची पहिली भेट २००६मध्ये झाली होती. मनोजनं २०१३मध्ये हावडामध्ये स्थायिक असलेल्या सुष्मिता रॉयशी विवाह केला.

६ वर्ष एकत्र राहिल्यानंतर मनोज-सुष्मिता यांनी प्रेमविवाह केला. सुष्मिता सोशल मीडियावर तिच्या हॉट फोटोमुळं नेहमीच चर्चेत असते.

२०१८ मध्ये मनोज आणि सुष्मिता यांना पुत्ररत्न झाला. सुष्मिताचे इंस्टाग्रामवर ४३ हजारांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.