शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भिवंडीत १ कोटी ६७ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनासह मालमत्ता गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2021 6:12 PM

मागील पंधरा दिवसातील ही तिसरी मोठी कारवाई असून या कारवाईत १ कोटी ६७ लाख २३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व ३४ लाख किमतीची एकूण पाच वाहने असा एकूण २ कोटी १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले असून या कारवाई मुळे गुटखा माफियां मध्ये खळबळ उडाली आहे .

नितिन पंडीत

भिवंडी: भिवंडीत अन्न व औषध प्रशासन व मालमत्ता गुन्हे शाखा ठाणे यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चार टेम्पो व एका कंटेनर मधून तब्बल १ कोटी ६७ लाख २३ हजार रुपयांचा गुटखा शनिवारी जप्त करण्यात आला आहे. 

 ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड यांना गुप्त बातमीदारा मार्फत भिवंडीत कंटेनर व टेम्पो मधून गुटखा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली असतानाच याची खबर ठाणे गुन्हे शाखेतील मालमत्ता गुन्हे कक्षास लागली व त्यानंतर शंकर राठोड व त्यांच्या सोबत अन्न सुरक्षा अधिकारी  रा.सि. बोडके ,एम. ए. जाधव तसेच मालमत्ता गुन्हे कक्ष गुन्हे शाखा, ठाणे शहर येथील सहा. पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, पो. उप निरी. रविंद्र दळवी, सपोउपनि शामराव कदम, नामदेव देशमुख, स्वप्नीले प्रधान, पोहवा गणेश पाटील, वसंत बेलदार,  बाळासाहब भोसले, अर्जुन कराळे, नासंग शिरसागर, आशा गोळे यांच्या संयुक्त पथकाने भिवंडीतील अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर पाळत ठेवून भिवंडी शहराच्या दिशेने येणारे चार टेम्पो अडवीत त्यांच्या कडे गाडीची कागदपत्रे व मालाची चौकशी सुरू केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने टेम्पोतील मालाची तपासणी करता त्यामध्ये एकूण ६३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा सुगंधी तंबाखू आढळून आली .

             या कारवाई दरम्यान एक टेम्पो चालक तेथून पसार होण्यात यशस्वी झाला तर तीन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुटखा भिवंडी तालुक्यातील कालवार येथील श्री शुभम इंडस्ट्रीयल पार्क येथील गोदामा समोर उभ्या असलेल्या वाहनातून भरल्याचे सांगितले. त्यांनतर पथकाने त्या ठिकाणी धाव घेत तेथे उभ्या असलेल्या कंटेनर ची तपासणी केली असता त्यामध्ये १ कोटी ३ लाख ९३ हजार रुपयांचा राजनिवास गुटखा,प्रिमियम एक्स. एल.०१, जाफरानी जर्दा,गोल्ड ९०००,पी.के. गुटखा या नावाने विक्री केला जाणारा गुटखा आढळून आला तर कंटेनर चालक पसार झाला.

           हा सर्व मुद्देमाल व चार टेम्पो एक कंटेनर जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड यांनी टेम्पो चालकांविरोधात  नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी रविवारी पहाटे याबाबत गुन्हा दाखल करीत टेम्पो चालक रवि भद्रीया नायक,मोहम्मद हनिफ जमिल अहमद शेख ( रा.भिवंडी ) व शंकर पुकीर रजक ( रा.कामण ता वसई ) या तीन चालकांना ताब्यात घेतले आहे.

              मागील पंधरा दिवसातील ही तिसरी मोठी कारवाई असून या कारवाईत १ कोटी ६७ लाख २३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व ३४ लाख किमतीची एकूण पाच वाहने असा एकूण २ कोटी १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले असून या कारवाई मुळे गुटखा माफियां मध्ये खळबळ उडाली आहे .

टॅग्स :Policeपोलिस