मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी राहत्या घरातून गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली होती. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवात संपला असून त्यांनी ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
या युक्तिवादात घरत यांनी कोर्टात सांगितले की, एका मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडिओ डिलीट केलेत. या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी १०.३० पासून व्हाॅटस अप चॅटिंग आहेत. या दोघांत व्हाॅटस अप काॅल झाले. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला, त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही. सदावर्ते यांनी युनियनकडून पैसेही गोळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1 कोटी 55 लाखांहून अधिकची रक्कम गोळा केली आहे. काहीजण यामागे आहेत, जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करतायेत. गेली ६ महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. ५३० रुपये प्रत्येक एसटी कर्मचा-यांकडून गोळा केले गेले. जवळपास दीड कोटी रुपये रक्कम जमा आहे. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूरमधून व्हाॅटस अप कॉल झाले होते. नागपूर कॉल नंतर 'पत्रकार पाठवा' चा मेसेज करण्यात आले. दुपारी 2.42 काही पत्रकारांनाही कॉल करण्यात आले. हा सुनियोजित कट होता. आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता आहे. मोहम्मद शेखने व्हॉट्स अप मेसेज केले आहेत. बॅनर पण तयार केले होते असून सावधान शरद ...सावधान शरद असे बॅनर तयार करण्यात आले. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे. सदावर्ते यांचा विजयोत्सव बारामतीत साजरा करण्याची मिटींगसाठी एक बैठक झाली होती. जमा केलेल्या पैशांचे इतर ही काही लाभार्थी आहेत, हे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी ४ नवीन अटक केली आहे तर एकाच शोध सुरु आहे. आरोपी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, सविता पवार या चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली होती. आणखी मोबाईल फोन शोधायचा आहे आणि १ कोटी ८० लाख रुपये कोणी कसे गोळा केले, ते पैसे कोणी कोणी वापरले याचा तपास करायचा आहे.
सिल्व्हर ओक हल्ल्याआधी झाली होती मीटिंग, नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू
गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात केले हजर, सातारा पोलीस ताबा मागणार