मुंबई - गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ ने मोठी कारवाई करत १० किलो एमडी (मॅफेड्रॉन) नावाचा महागडा अमली पदार्थ हस्तगत केला आहे. तसेच दोन जणांना कक्ष - ९ ने केली आहे. सध्या बाजारात एमडी हा अमली पदार्थ २ हजार रुपये प्रति ग्रॅम विकला जातो. त्याप्रमाणे कक्ष - ९ ने हस्तगत केलेला अमली पदार्थाची किंमत अंदाजे १ कोटी ४५ लाख इतकी आहे. प्रकटीकरण - १ चे उपायुक्त निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष - ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने हि मोठी कारवाई केली आहे. सलीम खान (वय - 45) आणि नृरुल हुदा (वय - 60) असे या आरोपींची नावे आहेत.
१३ जुलै रोजी वांद्रे पश्चिमेकडील सी लिंक ब्रिजखाली असलेल्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीजवळ एक इसम अमली पदार्थ विकण्यास येणार असल्याची खात्रीलायक माहिती कक्ष - ९ च्या सहाय्य्क पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचत नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीजवळून संशयास्पद हालचाली करीत असताना आढळून आलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण १०५५ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थाचा साठा सापडला. अधिक चौकशीत त्याच्याकडून अजून एक पुढे आले. तसेच त्याच्या राहत्या घरातून देखील २०१२ ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आहे. सलीम आहि नृरुल या दोघांना देखील १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.