मुंबई: बोरिवली रेल्वे स्थानकावर बॅग अदलाबदलीमुळे हरवलेले १० तोळे सोने कस्तुरबा पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोधले. दोन पोलीस शिपायांच्या तत्परतेमुळे हे यश पोलिसांना मिळाले असून वरिष्ठांकडून या पथकाचे कौतुक केले जात आहे.
परवीन सिंग राठौड़ व नेहा पारेख यांची १० तोळे सोने व इतर मौल्यवान वस्तू असलेली बॅग बोरीवली रेल्वे स्थानकावर अदलाबदल झाली होती. याबाबत बॅग मालकाने आरपीएफ, बोरवली रेल्वे स्टेशन येथे माहिती दिली. आर पी एफने याबाबत कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यास याबाबत कळविले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, पोलीस शिपाई रुपेश पाटील आणि गणेश पाटील यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपास करत अवघ्या दोन तासात बदली झालेली बॅग त्यांनी शोधून काढली.