लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या तपास यंत्रणेने भारतातील सायबर फसवणुकीसंदर्भात दिलेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी सीबीआयने देशात १०५ ठिकाणी छापेमारी केली. त्यात पुण्यातील दोन कॉल सेंटरवरही छापेमारी करत त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली.
राजस्थानातील एका कॉल सेंटरमधून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी १ किलो सोने आणि ५ कोटी रुपयांची रोख रक्कम या छापेमारीदरम्यान जप्त केली. या कारवाईतून ३००पेक्षा जास्त लोकांची माहिती प्राप्त झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"