शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

१० वी पास ठगबाजाने घातली ३ हजार लोकांना टोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 4:48 AM

crime news स्वत: बांधले बंगले - गुंतवणूकदारांना केले कंगाल 

नरेश डोंगरे    लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे देशभर हाहाकार उडाला असतानाच्या काळात एक दहावी पास ठगबाज नागपुरात रिअलट्रेड कंपनी सुरू करतो... माणूस माणसाकडे जायला तयार नसतानाच्या या कालावधीत या कंपनीचा मास्टरमाईंड प्रमोटर रोज शेकडो गुंतवणूकदारांना कंपनीचे सभासद बनवितो अन् एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला तर  तिसरा चाैथ्याला अशा प्रकारे तब्बल तीन ते चार हजार लोकांना फसवून त्यांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केले जाते. एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही फसवणुकीची मालिका उघड झाल्यानंतर तपास अधिकारीही चक्रावतात. 

प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय ठगबाज चार्ल्स शोभराज यांच्या बनवाबनवीची आठवण करून देणारे अन् या ठगबाजाचे नाव आहे विजय रामदास गुरनुले.हिंगणा भागात राहणारा गुरनुले केवळ दहावी पास असला तरी चांगलाच गुरुघंटाल आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत असताना आणि मोठमोठे उद्योग व्यवसाय कोलमडले असताना गुरुघंटाल गुरनुलेने त्याचा आयटी एक्सपर्ट मावसभाऊ अविनाश महादुलेच्या मदतीने एप्रिल महिन्यात ऑनलाईन ट्रेडिंग कंपनी सुरू केली. मेट्रो रिजन अन् रिअल ट्रेडच्या नावाखाली त्यांनी चेनमार्केर्टिंग सुरू केली. 

ठगबाज गुरनुले आणि सरकारी नोकरीत असलेला महादुले झुम मीटिंग घेऊन गुंतवणूकदारांना नोटांचे झाड कसे लावायचे, त्याबाबत माहिती देत होते. एकाने ६९ हजार रुपये जमा करणारे ४ जण कंपनीशी जोडायचे. कंपनी प्रत्येक आठवड्याला ५५०० रुपये कमिशन देईल. पती-पत्नीने ४ लाख रुपये जमा करणारे चार मेंबर जोडल्यास आठवड्याला २० हजार रुपये कमिशन मिळेल, असे सांगितले जात होते. 

अशा प्रकारे या ठगबाजांनी त्यांच्या चिटिंग कंपनीत चार महिन्यात चक्क ३ ते ४ हजार गुंतवणूकदार जोडले अन् त्यांचे ५० ते ६० कोटी रुपये (किमान) गिळंकृत केले. यातून गुरनुले आणि साथीदारांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मालमत्ता विकत घेतली. बंगले उभारले. त्यांच्या घशात आपली आयुष्याची पुंजी ओतणारे मात्र अक्षरश: कंगाल झाले आहेत. 

आता पोलिसांकडे गर्दी आतापावेतो गुरनुलेच्या कंपनीत गर्दी करणाऱ्यांनी आता त्याची बनवेगिरी उघड झाल्याने  तक्रारी देण्यासाठी पोलिसांकडे गर्दी चालवली आहे. काहींच्या तक्रारी सोमवारी पोलिसांनी ऐकून घेतल्या असून, काहींना मंगळवारी बोलविण्यात आले आहे. 

मृगजळ दाखवणारा कोठडीतझूम मीटिंग घेऊन गुंतवणूकदारांना मृगजळ दाखवणारा आरोपी अविनाश महादुले आता पोलीस कोठडीत पोहचला आहे. नॅशनल प्रमोटर म्हणवून घेणारा महादुले आता मात्र आपला या कंपनीशी संबंध नसल्याचा कांगावा करीत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस