पुणे : वेगवेगळ्या माध्यमातून ११ लाख ७ हजार रुपयांचे सोने तस्करी करुन आणणाऱ्याला सीमा शुल्क विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले़. त्याच्याकडून ३४९़९३ ग्रॅम सोन्याचे दोन बिस्कीटे तुकड्यांच्या स्वरुपात जप्त केले आहेत़. किचेन, चलनी शिक्क्यामधून हे सोने आणले होते़. शेख तारीक महमुद (रा़ मुंबई) असे प्रवाशाचे नाव आहे. शेख महमुद हा तीन चार दिवसांपूर्वी मुंबईहून दुबईला गेला होता़. दुबईहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे स्पाईस जेटचे विमान उतरले. त्यावेळी या विमानातून आलेला प्रवासी शेख तारीक महमुद याची तपासणी केल्यावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाला त्याच्याजवळ सोने असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याची झडती घेतल्यावर दोन सोन्याचे बिस्कीट चार भागात तुकडे करून जीन्स पॅन्टला कमरेला लावून आणलेले तर दोन सोन्याचे सिक्के हुबेहुब चलनी शिक्क्याप्रमाणे बनवलेले त्याच्या पाकीटात आढळून आले. तर रेडियम पेटिंग प्लेटींग केलेली एक सोन्याचीच किचेन रिंग असे एकूण ११ लाख ७ हजार ८७ रुपये किंमतीचे ३४९़९३ ग्रॅम सोने त्याच्याजवळ आढळून आले. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने त्याच्याकडून सोने जप्त केले असून पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त हर्षल मेटे यांनी दिली.
दुबईहून आलेले तस्करीचे ११ लाखांचे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 8:35 PM
किचेन, चलनी शिक्क्याच्या माध्यमातून ११ लाख ७ हजार रुपयांचे सोने तस्करी करुन आणणाऱ्याला सीमा शुल्क विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले़.
ठळक मुद्देसीमा शुल्क विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई