वास्को - वर्षाचा शेवटचा महिना डीसेंबर सुरू झाला की गोव्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात रेव्ह, ट्रांन्स, डिस्को अशा विविध प्रकारच्या पार्ट्यांची सुरवात होत असून ह्या काळात विदेश तसेच देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात सुट्टी साजरी करण्यासाठी येतात. ह्याच काळात गोव्यात मागच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवहारही वाढत असल्याचे मागच्या काही वर्षात पोलीसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून दिसून आले आहे. गोव्याच्या मुरगाव तालुक्यात असलेल्या वास्को, वेर्णा व मुरगाव पोलीसांना जानेवारी ते अजून पर्यंत १७ विविध प्रकरणात ६ लाख रुपयांचा अमली पदार्थ पकडलेला असून नवीन वर्षाच्या काळात अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी पोलीसांनी कडक नजर ठेवली आहे.नवीन वर्ष जसे जसे जवळ येते तसे तसे विदेशी व देशी पर्यटकांची गोव्यात येण्याची संख्या दिवसेंन दिवस वाढते. डीसेंबर महीना लागला की गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हजारो पर्यटक यायला लागतात. ह्या काळात गोव्याच्या विविध भागात होणाºया उत्कृष्ठ अशा पार्टीमध्ये सहभागी होण्याची शेकडोंची इच्छा असते. सदर काळात गोव्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवहार होत असल्याचे मागच्या काही वर्षात पोलीसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून दिसूनही आलेले आहे. मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा व मुरगाव पोलीसांनी नवीन वर्षाच्या काळात अमली पदार्थांचा व्यवहार करणाºयांना गजाआड करण्यासाठी कडक रित्या नजर ठेवलेली असल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. मुरगाव तालुक्यात असलेल्या बोगमाळो, वेळसांव अशा विविध समुद्र किनाºयावर तसेच सडा भागातील जेपनीझ गार्डन अशा विविध ठिकाणी पोलीसांनी कडक नजर ठेवलेली असून जर कोणाकडून संशयास्पद हालचाली करताना आढळल्यास त्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहीती सावंत यांनी दिली. मागच्या काही काळात गोव्यात विदेश नागरीकांकडूनही अमली पदार्थांचा व्यवहार करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावरही नजर ठेवण्यात येत असल्याची माहीती त्यांनी पुढे दिली. मुरगाव तालुक्यात बंदर व इतर आस्थापनांमुळे येथे मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रेलर अशा अवजड वाहनांची वाहतूक होत असून यांच्यावरील ट्रकचालकांची तपासणी सध्या चालू करण्यात आल्याची माहीती सावंत यांनी दिली. यापूर्वी अशा ट्रक चालकांकडून गांजा, चरस सारखा अमली पदार्थ आढळलेला असून ह्याच अनुषंघाने नवीन वर्षाच्या काळात त्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहीती सावंत यांनी दिली. मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा व मुरगाव ह्या तीनही पोलीस स्थानकांनी मागच्या एका वर्षाच्या काळात १७ विविध प्रकरणात कारवाई करून ५ लाख ९५ हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला असल्याची माहीती उपअधीक्षक सावंत यांनी दिली. ह्या १७ प्रकरणात १८ जणांना गजाआड करण्यात आलेले असून त्यात ११ गोमंतकीय व ७ बिगर गोमंतकीय होते. जानेवारी ते अजून पर्यंत ४ किलो २०० ग्राम गांजा तर १० ग्राम चरस मुरगाव तालुक्यातील विविध पोलीस हद्दीतून जप्त करण्यात आलेला असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी सांगितले. वेर्णा पोलीसांनी मागच्या ११ महीन्यात चार वेगवेगळ््या प्रकरणात ३ किलो २३० ग्राम गांजा जप्त केला यात चौघांना अटक करण्यात आली होती. वेर्णा पोलीसांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ चार लाख पाच हजार रुपयांचा असल्याची माहीती सावंत यांनी दिली. वास्को पोलीसांनी १२ वेगवेगळ््या प्रकरणात १३ जणांना गजाआड करून ८९३ ग्राम गांजा तर १० ग्राम चरस मागच्या ११ महीन्यात जप्त केला आहे. ह्या कारवाईत जप्त केलेला अमली पदार्थ १ लाख ८१ हजार रुपयांचा असल्याचे सावंत यांनी कळविले. मुरगाव पोलीसांना ११ महीन्यात फक्त एकाचला अमली पदार्थासहीत गजाआड केले असून त्याच्याकडून आठ हजार रुपयांचा ८० ग्राम गांजा जप्त केला.मागच्या दोन वर्षात मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा व मुरगाव ह्या पोलीस स्थानकांनी अमली पदार्थांच्या विरुद्ध कडक रित्या कारवाई केली असून २०१७ सालात ह्या तीनही पोलीस स्थानकांनी मिळून १९ विविध प्रकरणात १२ लाख १७ हजार रुपयांचा अमली माल पकडल्याचे उपअधीक्षक सावंत यांनी सांगितले. २०१७ सालात करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या कारवाईत ५ गोमंतकीय, १४ बिगरगोमंतकीय तर एका नेपाळी नागरीकाला अटक करण्यात आली होती. नवीन वर्षाच्या आगमनाच्या काळात अमली पदार्थ विकण्याचा व्यवहारही मुरगाव तालुक्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलीसांनी येथे पूर्णपणे सतर्कता बाळगलेली असून अशा लोकांवर कडक रित्या कारवाई करण्यासाठी पोलीसांनी डोळ््यात तेल घालून नजर ठेवलेली असल्याचे सावंत यांनी माहीतीत शेवटी कळविले.
११ महिन्यांत मुरगाव तालुक्यातून ६ लाख रुपयांचा ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 9:02 PM