जळगाव : बॅँकेतून पेन्शनची रक्कम काढल्यानंतर मेडिकलवर औषध घ्यायला गेलेले जगन्नाथ बाबुराव भालेराव (७०, रा.आशाबाबा नगर, जळगाव) यांच्या पिशवीतून ११ हजार लांबविण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी दाणाबाजारानजीक पोलन पेठेत घडली. दरम्यान, दोन संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्या असून त्यांनीच ही रक्कम लांबविल्याचा संशय आहे. लॉकडाऊन शिथील होताच बाजारपेठेत गर्दी झाली आणि त्याचा फटका भालेराव यांना असा बसला.
जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले जगन्नाथ भालेराव हे मंगळवारी नवी पेठेतील जिल्हा बॅँकेत पेन्शन घ्यायला आले होते. दीड वाजता बँकेतून १३ हजार रुपये काढले. दोन हजार बाजुला काढून ११ हजार रुपये सोबत आणलेल्या पिशवीत ठेवले.यानंतर ते दाणा बाजारात गेले. तेथे दत्त मंदिराच्या समोरील मेडिकल दुकानावर औषधी खरेदी केल्यानंतर पिशवीतील ११ हजार रुपये गायब झाल्याचे भालेराव यांच्या निदर्शनास आले. त्यांना नातेवाईकांशी संपर्क साधून घटनास्थळावर बोलावून घेतले. मेडिकलवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता भालेराव यांच्यामागे दोन महिला संशयास्पद फिरताना दिसून आल्या. त्यांच्याजवळ लहान मुलेही होती. याच महिलांनी ही रक्कम लांबविल्याचा संशय आहे. दरम्यान, भालेराव यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. लॉकडाऊन शिथील झाल्याच्या पहिल्याच दिवशी चोरी करणाऱ्या महिला सक्रिय झाल्या. काही महिन्यापूर्वी देखील फुले मार्केट परिसर व नवीन बसस्थानकात चोरी करताना महिलांना पकडण्यात आले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!
बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता
कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत
Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!
Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार