भोपाळ : नवीन मोटर वाहन कायद्याच्या अनेक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील (छत्तीसगड) प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला मोठा दंड ठोठावला आहे. छत्तीसगडमध्ये सुधारित मोटार वाहन अधिनियम 2019 च्या अंतर्गत कोणत्याही दुचाकी वाहनांना दंड म्हणून आकारण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे म्हटले जात आहे.
नियमाचे उल्लंघन करणार्याचे व्यक्तीचे नाव प्रकाश बंजारा असे सांगितले जात आहे. तो मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील अमरपुरा गावचा रहिवासी आहे. रायगड शहरातील डीआयबी चौकाजवळ कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवले, त्यावेळी तो दुचाकीवर पाणी संकलन करणारे ड्रम विकत होता. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत प्रकाश बंजाराच्या कागदपत्रांची तपासणी केली.
हेल्मेट न घालता गाडी चालविण्याचा आरोप परिवहन विभागाद्वारे चलान कापले आहे. त्यानुसार प्रकाश हा हेल्मेट न घालता गाडी चालवत होता आणि त्यांच्या गाडीचा नोंदणी क्रमांकही नव्हता. त्याने ही दुचाकी मध्य प्रदेशातून खरेदी केली आणि वाहन नोंदणी न करता पाण्याचे ड्रम विकण्यासाठी रायगडमध्ये आला होता.
या नियमांचे उल्लंघननोंदणी क्रमांक, विमा कागदपत्रे आणि वाहन चालविण्याचा परवाना व हेल्मेट न घालता वाहन चालविल्याबद्दल परिवहन विभागाने प्रकाशला 1,13000 रुपये दंड ठोठावला आहे. ज्यामध्ये हेल्मेट न घातल्याबद्दल 1000 रुपये, वाहन विमा न दिल्याबद्दल 2000 रुपये, वाहन नोंदणी न केल्याबद्दल 5000 रुपये आणि वाहन चालविण्याचा परवाना नसल्यास 5000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दुचाकी विक्रेत्याद्वारे गाडी विकतेवेळी CH -VII 182 A -1 चे उल्लंघन केल्याबद्दल एक लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.