शहरं
Join us  
Trending Stories
1
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
5
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
6
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
7
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
8
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
9
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
10
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
11
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
12
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
13
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

'सॉरी पप्पा, मला माफ करा' असं लिहून ११वीच्या विद्यार्थिनीने केला आत्महत्येचा प्रयत्न;छेडछेडीला वैतागून उचलले टोकाचं पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 6:31 PM

Suicide Attempt :या घटनेत ही मुलगी होरपळली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जबलपूर - 'सॉरी पप्पा...' म्हणत एका ११वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. स्वत:वर पेट्रोल ओतून तिने पेटवून दिले. या घटनेत ही मुलगी होरपळली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पीडित मुलगी अल्पवयीन आहे. ही घटना मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. जबलपूर येथील ११वीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे लिहिली आहेत. इतकेच नाही तर आपण पोलिसांत सुद्धा तक्रार केली होती मात्र, पोलिससांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. 

पीडित मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हणत आरोपी तरुणांची नावे तिले चिठ्ठीत लिहिली आहेत. सुसाईड नोटमध्ये मी आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येसाठी ही लोक जबाबदार आहेत. या सर्वांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मला घरातून बाहेर पडणं अवघड झालं. ही मुलं माझ्या घराच्या आसपास फिरत असतात. मी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली होती. मात्र, काहीही कारवाई झाली नाही. माझ्यामुळे माझ्या बहिणींचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे. सॉरी पप्पा..मला माफ करा, असं लिहिलं आहे. 

स्वत:ला पेटवून घेतल्याने पीडित मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. पीडित मुलीला कुटुंबीयांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. सुसाईड नोटमध्ये पीडित मुलीने पोलिसात तक्रार करूनही काहीही कारवई झाली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र, आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सुसाईड नोटमध्ये ज्या मुलांची नावे पीडित तरुणीने लिहीली आहेत, त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

अर्धनग्न अवस्थेतील बेशुद्ध पडलेली अल्पवयीन मुलगी पोलिसांना आढळली; नशेचं इंजेक्शन देऊन केला

आगीत मुलगी गंभीररीत्या भाजली. कुटुंबीयांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेने वैद्यकीय रुग्णालयात नेले.तिची प्रकृती चिंताजनक आहे. रांझी परिसरातील मस्ताना चौकात राहणारी ११वीची विद्यार्थिनी आपली तक्रार घेऊन याच रांझी पोलिस ठाण्यात गेली होती. सुसाईड नोट समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जे पोलीस या अल्पवयीन मुलीसोबत घडत असलेला विनयभंग किंवा अन्य घटनांबाबत अनभिज्ञ होते. सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थी