मीरारोड - मीरारोडच्या कनकिया येथील पार्क व्हयु बारमध्ये मित्राला सोडवण्यास गेलेल्या सैन्यदलातील जवानासह त्याच्या दोन मित्रांना जबर मारहाणप्रकरणी मीरारोड पोलीसांनी बारच्या व्यवस्थापकासह ११ वेटरना अटक केली आहे. मात्र, बारचे सीसीटीव्ही फुटेज मात्र अजून मिळालेले नाही. तर जवानास मारहाण करुन लष्कराबद्दल अपशब्द काढणाऱ्या मुजोर बार कर्मचाऱ्यांना अटक करा म्हणून मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शिवसेना, मनसे व मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडली होती.बीलासोबतच अतिरीक्त ३०० रुपये लावल्याने त्याबद्दल बार व्यवस्थापकाकडे विचारणा करणाऱ्या संदेश पार्टे यास मारले म्हणून प्रशांत वाघमारे हे जवान वाद मिटवण्यामध्ये पडले. त्यावर बार कर्मचाऱ्यांनी पार्टेसह जवान वाघमारे व अन्य एक मित्र आनंद काळे यांना बेदम मारहाण केली. पोलीस आणि संदेशचा भाऊ आल्याने तिघांची सुटका झाली.या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरुन ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तर व्यवस्थापकासह अन्य ११ वेटर मिळून १२ जणांना अटक केली. जवानास मारहाण करुन लष्कराबद्दल अपशब्द काढल्याचे कळताच मराठी एकीकरण समिती, मनसे, शिवसेनेच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री पर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. आरोपींना अटक करा अशी मागणी सर्वांनी लाऊन धरली होती. १२ आरोपींना अटक केल्याचे व अन्य आरोपींची पडताळणी करुन अटक करणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. परंतु बारमधील सीसीटीव्हीचे फुटेज मात्र अजुनही पोलिसांच्या हाती लागले नसल्याने ते डिलीट केले जाण्याची भिती व्यक्त होत आहे.
सैन्य दलातील जवानास मारहाण करणाऱ्या बारच्या व्यवस्थापकासह ११ वेटरना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 9:00 PM
जवानास मारहाण करुन लष्कराबद्दल अपशब्द काढणाऱ्या मुजोर बार कर्मचाऱ्यांना अटक करा म्हणून मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शिवसेना, मनसे व मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडली होती.
ठळक मुद्दे जवानासह त्याच्या दोन मित्रांना जबर मारहाणप्रकरणी मीरारोड पोलीसांनी बारच्या व्यवस्थापकासह ११ वेटरना अटक केली आहे. पोलीस आणि संदेशचा भाऊ आल्याने तिघांची सुटका झाली.