शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

तब्बल पावणेपाच कोटींचा 1200 ड्रोनचा साठा जप्त; जेएनपीटी बंदरात मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 8:11 AM

तस्करी मार्गाने आयात ड्रोनची किंमत सुमारे पाच कोटींच्या घरात आहे. याआधीही डीआरआयच्या विभागाने ३६ ड्रोनचा साठा जप्त केला होता.

उरण : जेएनपीटी बंदरातून रक्तचंदनानंतर आता चीनने बंदी घालण्यात आलेल्या खेळण्यातील ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे. न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या क्राइम इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी इंधन पंपाच्या नावाने आयात करण्यात आलेला १२०० ड्रोनचा साठा एका ४० फुटी कंटेनरमधून ताब्यात घेण्यात आला आहे. तस्करी मार्गाने आयात ड्रोनची किंमत सुमारे पाच कोटींच्या घरात आहे. याआधीही डीआरआयच्या विभागाने ३६ ड्रोनचा साठा जप्त केला होता. जेएनपीटी बंदरातून याआधी सोने, चांदी, शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ, सापांच्या कातडीची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती. त्यानंतर मागील काही वर्षांपासून आखाती देशात निर्यात होणाऱ्या रक्तचंदनाच्या तस्करीला उधाण आले आहे. त्यानंतर आता देशातबंदी घालण्यात आलेल्या चीनच्या ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे. गुप्त माहितीच्या आधारावरच बंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा साठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीही जेएनपीटी बंदरातून चीनमधून आयात करण्यात आलेल्या १४.११ लाख किमतीचा ३६ ड्रोनचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.देशातील ड्रोनच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारत सरकारने काही अपवादांसह परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घातली आहे.  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने गेल्या महिन्यात परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे.

जेएनपीटीतून चिनी बनावट ड्रोनची तस्करी; क्राइम इंटेलिजेन्स युनिटची कारवाई; तस्करीसाठी न्हावा-शेवा सांकेतिक नावदेशात आयातीवर बंदी घालण्यात आलेल्या या चिनी बनावटीच्या ड्रोनची तस्करी करण्यासाठी तस्करांनी याला “न्हावा शेवा” असे सांकेतिक नाव दिले आहे. याच सांकेतिक नावाने या ड्रोनची तस्करी केली जात असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.