शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

122 करोड घोटाळ्यातील कंत्राटदार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 11:28 PM

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक यांची भूमिका संशयास्पद ??

नालासोपारा - 122 करोडचा घोटाळा केला म्हणून 25 ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात 2 मार्च 2019 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण 52 दिवस गुन्हा दाखल झाल्यावरही तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी तपास सुरू आहे असे सांगून कारवाई करत असल्याचे सांगितले. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारच्या सभेत मनपाच्या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करणार असल्याचा सज्जड दम दिल्यानंतर मनपाने आणि विरार पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून 25 पैकी एका कंत्राटदाराला मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी पकडले आहे. बाकीच्या 24 कंत्राटदारावर अद्याप कोणती कारवाई न केल्यामुळे मनपा आणि विरार पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत आहे. 

मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने 122 करोड रुपयांचा घोटाळा विरार पोलिसांनी दाखल केला पण कारवाई होत नसल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू होती. युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेकरिता सोमवारी मुख्यमंत्री विरारला आले होते. त्यांनी मनपाच्या घोटाळ्याची तसेच विविध प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे सांगितल्यावर घाबरून आणि कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल झालेले आकाश इंटरप्रायजेसचे विलास चव्हाण यांना अटक केले असून बाकीचे मातब्बर आणि त्याच्यावर राजकीय वरदहस्त आहे त्या 24 कंत्राटदारांना नक्की अटक करणार का हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे. सदर गुन्ह्याचा उलगडा करून खरोखरच कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा गुन्हा विरार पोलिसांकडून काढून पालघर स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत फोनवरून तपास अधिकारी विवेक सोनावणे यांना विचारणा केले असता उर्मट उत्तर देत माहिती देण्यास टाळाटाळ केली. 

नेमके काय होते प्रकरण.....

वसई विरार मनपाच्या 3165 ठेका कर्मचाऱ्यांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण 122 करोड च्या घोटाळ्यात 29 करोड 50 लाख रुपयेचा शासकीय महसूलचाही समावेश असून 92 करोड 50 लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या पगाराचे आहेत. ठेका कर्मचाऱ्यांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हे दाखल झालेले 25 घोटाळेबाज ठेकेदार.....

दिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकुर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटिल), संखे सिक्युरिटी सर्विस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओम साई  इंटरप्राइजेस (विनोद पाटिल), बालाजी सर्विस (मंगरूळे बी. दिगंबरराव), वरद इंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद इंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक इंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्ट्रिकल एंड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक इंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व इंटरप्राइजेस, सद्गुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम इंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबर कॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), आकाश इंटरप्रायजेस (विलास चव्हाण), युनिव्हर्सल इंटरप्रायजेस (सुबोध देवरुखकर), बी एल होणेंस्ट सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकर आणि श्री अनंत इंटरप्रायजेस (रवी चव्हाण)

अटक केली की नाही मी सांगू शकत नाही आणि तसे सांगितले तर बाकीचे पळून जातील. - विवेक सोनावणे (तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)

नेमके काय आहे तसेच ते का असे बोलले याचा मी तपास करतो. - विजयकांत सागर (अप्पर पोलीस अधीक्षक, वसई)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकVasai Virarवसई विरारEknath Shindeएकनाथ शिंदे