गुजरातच्या सुरत शहरात १३ वर्षीय एका मुलाला श्वास गुदमरून मृत्यू झालाय. तो घरात कथितपणे एक स्टंट करत असताना ही घटना घडली. हा स्टंट करत असताना दोरी त्याच्या गळ्याभोवती आवळली गेली आणि त्याला गळफास बसला. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलाच्या आई-वडिलांनुसार आठव्या वर्गात शिकत असलेला मुलगा स्टंटचे व्हिडीओ बनवत होता. ते व्हिडीओ तो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत होता.
सरथाना पोलीस स्टेशनचे इन्सेक्टर एम के गुर्जर म्हणाले की, ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. हा मुलगा त्याच्या घराच्या व्हऱ्यांड्यातील एका भींतीवरील खुंटीवर बांधलेल्या दोरीला लटकलेला आढळून आला. त्यांनी सांगितले की, 'आम्हाला वाटतं की ही घटना सायंकाळी पाच दरम्यान घडली असावी. त्यावेळी घरातील इतर लोक घरात नव्हते. मुलगा सायंकाळी साधारण साडे सहा वाजता दरम्यान दोरीला लटकलेला आढळून आला. त्यानंतर त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. (हे पण वाचा : विनाकारण फिरणाऱ्यांना बेडूक बनवून लाथ मारलेली; कोरोनाबाधिताकडून 'त्या' तहसीलदाराला मारहाण)
ते म्हणाले की, प्राथमिक पाहणीत हे समजलं आणि मुलाच्या आई-वडिलांनी सांगितलं की, मुलाचा मृत्यू स्टंट केल्याने झाला आहे. पोलीस या घटनेचा आत्महत्येच्या दृष्टीनेही तपास करत आहेत. कारण त्याच्या आई-वडिलांनी नुकतीच त्याला मोबाइल फोन वापरण्यास मनाई केली होती. (हे पण वाचा : अविश्वसनिय! सून आणि सासऱ्याच्या लव्हस्टोरीनं घेतला मुलाचा जीव, वाचून पायाखालची जमीनच सरकेल...)
मृतकाच्या मित्रांनी आणि आई-वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्याला गाण्याची, डान्सची आणि स्टंट करण्याची आवड होती. पोलीस म्हणाले की, 'असंही होऊ शकतं की दोरीसोबत स्टंट करत असताना मुलाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने त्याचा फोन परत घेतला होता. त्यामुळे असंही होऊ शकतं की त्याने रागाच्या भरात आत्महत्या केली असावी'.