लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २५ वर्षीय युवकाविरुद्ध अमडापूर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ जून राेजी घडली हाेती.१३ वर्षीय मुलीला स्वप्निल निंबाजी बोरकर याने वाईट नजरेने पाहून तिचा विनयभंग केल्याची घटना १६ जून राेजी घडली हाेती. याप्रकरणी पीडिताने १८ जून राेजी दिलेल्या फिर्यादीवरून अमडापूर पाेलिसांनी आराेपी स्वप्निल बाेरकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलीस आहेत. या प्रकरणात बालकांचे लैंगिक अत्याचापासून संरक्षण या कायद्यातंर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
१३ वर्षीय मुलीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 11:19 AM