अमेरिकेमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शाळेच्या कर्मचाऱ्याने टॉयलेट रूममध्ये कॅमेरा लावून 137 मुलींचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे उघड झाले आहे. हा कर्मचारी जवळपास एक दशकापासून हे कृत्य करत होता. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक करण्यात आली. यापूर्वी आरोपी कर्मचारी स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी गेला होता.
व्हँकुव्हरच्या अल्की मिडिल शाळेत कर्मचारी जेम्स मॅटसन (James Mattson) हा एका दशकाहून अधिक काळ काम करत होता. 38 वर्षीय जेम्सने मुलींच्या टॉयलेट रूममध्ये कॅमेरा बसवल्याचा आरोप आहे. शाळेत आतापर्यंत जेम्सने 137 व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे तपासात समोर आले आहे. जेम्स 2013 पासून शाळेत काम करत होता.
गेल्या आठवड्यात जेम्सच्या गर्लफ्रेंडने शाळेतील मुलींच्या व्हिडिओचे फुटेज पाहिले होते. त्यावेळी व्हिडिओमध्ये तिला मुली कपडे बदलत असल्याचे दिसून आहे. याबाबत जेम्सला विचारले असता, त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगितले. तसेच, शाळेतील चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे टॉयलेट रूममध्ये कॅमेरा लावल्याचे जेम्सने सांगितले. दरम्यान, सर्च वॉरंटच्या आधारे पोलिसांनी जेम्सच्या घराची झडती घेतली तेव्हा त्याच्या कॅम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमधून मुलींचे 137 व्हिडिओ सापडले. याशिवाय, संपूर्ण शाळेत दुसरा कॅमेरा नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसरीकडे, 13 ऑक्टोबरला शाळेच्या जिल्हा अधिकाऱ्याने एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये पालक आणि शाळेच्या कर्मचार्यांना तपासात सहकार्य करण्यास मदत करण्यास सांगितले होते. जेम्सला पहिल्यांदा विनावेतन रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा त्याला अटक करण्यात आली, तेव्हा त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. आता त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालणार आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, डिजिटल फॉरेन्सिक संबंधीत या प्रकरणाची चौकशी अतिशय जटिल आहेत. पुरावे तपासण्यासाठी वेळ लागतो, असे क्लार्क काउंटी शेरीफने म्हटले आहे. तर या प्रकरणी सीनिअर डिप्टी प्रोसिक्युटर केसे वू यांनी सांगितले की, जे काही आरोप आहेत ते नॉन-व्हॉयलेंट आहेत. जेम्सच्या गर्लफ्रेंडला हे व्हिडीओ मिळताच त्याने स्वतः पोलिसांजवळ पोहोचला.