धक्कादायक! १० रुपयांमुळे धाकट्या भावाची दगडाने ठेचून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 06:51 PM2019-09-17T18:51:21+5:302019-09-17T18:51:49+5:30

डिंडोरी जिल्ह्यातील मेहंदवानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

14 year old killed by elder brother for 10 rupees | धक्कादायक! १० रुपयांमुळे धाकट्या भावाची दगडाने ठेचून केली हत्या 

धक्कादायक! १० रुपयांमुळे धाकट्या भावाची दगडाने ठेचून केली हत्या 

Next
ठळक मुद्देडिंडोरी जिल्ह्यातील मेहंदवानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. 

मध्य प्रदेश - डिंडोरी जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भावानेच १४ वर्षीय धाकट्या भावाची १० रुपयांसाठी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी भाऊ फरार झाला आहे. डिंडोरी जिल्ह्यातील मेहंदवानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

मेहंदवानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरदा गावातील सत्तू गोंड या फिर्यादीने सोमवारी सकाळी दोन मुलं रविवारच्या सायंकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारामध्ये गोंड यांनी धाकड्या मुलाला पॉकेट मनी म्हणून १० रुपये दिले होते. या पैश्यातून तू जे काही खरेदी करशील ते मोठ्या भावासोबत वाटून घ्या असे नमूद केले आहे. गोंड यांनी पोलिसांना सांगितले की, धाकड्या मुलाकडे पैसे दिले कारण मोठा मुलगा कोणतीही वस्तू धाकड्या भावाशी शेअर करत नाही. धाकडे मुलगा १४ वर्षाचा आठवीत शिकणारा असल्याची माहिती पुढे गोंड यांनी दिली. दोन्ही भावंडांना रविवारी सायंकाळी शेवटचं दुकानाकडे जाताना पाहिलं. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने त्यांच्या शोध सुरु केला. सोमवारी सकाळपर्यंत दोन्ही भावंडं घरी न परतल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सोमवारी दुपारी पोलिसांना गावापासून ३ किमी झाडीत पडलेला धाकड्या भावाचा मृतदेह आढळून आला. मृत मुलाचं डोकं ठेचलं असून जबड्यावरही जखमा असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. 

Web Title: 14 year old killed by elder brother for 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.