१.४२ कोटी रोकड, ३२ फ्लॅट अन्...; काँग्रेस आमदाराच्या घर, कंपनीवर ईडीची धाड, काय सापडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 10:17 AM2024-07-21T10:17:49+5:302024-07-21T10:18:45+5:30

बँक व्यवहारांच्या फसवणुकीसाठी ईडीने काँग्रेस आमदारावर कारवाई केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जप्त केली आहे. 

1.42 crore in cash, 32 flats and...; ED raid on Congress Mla Rao Dan Singh house, company, what did they find? | १.४२ कोटी रोकड, ३२ फ्लॅट अन्...; काँग्रेस आमदाराच्या घर, कंपनीवर ईडीची धाड, काय सापडलं?

१.४२ कोटी रोकड, ३२ फ्लॅट अन्...; काँग्रेस आमदाराच्या घर, कंपनीवर ईडीची धाड, काय सापडलं?

गुरुग्राम - महेंद्रगड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार राव दानसिंह, त्यांचा मुलगा आणि सहकाऱ्यांच्या कंपनीवर दिल्ली, गुरुग्राम, जमशेदपूर इथं १६ जागांवर ईडीने धाड टाकली आहे. १८ जुलैच्या सकाळी सुरू झालेली ही धाड कारवाई शुक्रवारी संध्याकाळी संपली. ईडीच्या तपासात कंपनी आणि नेत्यांच्या बँक अकाऊंटमध्ये हेराफेरी झाल्याचं समोर आलं. 

ईडीच्या या कारवाईत १.४२ कोटी रोकड, काही महत्त्वाची कागदपत्रे, बेनामी ३२ फ्लॅट, जमीन, अनेक लॉकर ही सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात आमदार राव दानसिंह यांचा मुलगा अक्षत सिंह यांच्या कंपनीचाही सहभाग आहे. सीबीआयकडे दाखल गुन्ह्याची चौकशी करताना ईडीनं मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली मेसर्स एलाइड स्ट्रिप्स लि. संचालक गौरव अग्रवाल, मोहेंदर अग्रवाल आणि आमदार राव दानसिंह, मुलगा अक्षत सिंह यांच्या संस्था, कंपनीवर ईडीने धाड टाकली. या लोकांनी पैशांची अफरातफर, फसवणूक आणि कॅनरा बँकेला १३९२ कोटींना गंडवल्याचा आरोप आहे.

तपास अजून सुरू

बँकांकडून कोट्यवधीचे कर्ज लाटून बेनामी कंपन्यांकडून बनावट व्यवहार दाखवण्यात आले. त्यात जमीन खरेदी दिर्घ गुंतवणूक करण्यात आली. राव दानसिंह आणि त्यांच्या मुलाने एएसएल कंपनीतून कर्ज घेतले परंतु ते परतफेड केली नाही. बँकांकडून घेतलेले कर्ज कंपन्यांमध्ये वापरले. हा सगळा व्यवहार बनावट कंपन्यातून करण्यात आला. त्या बदल्यात रोकड, जमीन खरेदी करणे आणि अन्य कामांत कर्जाचा पैसा गुंतवण्यात आला. सध्या या सर्व प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं ईडीने सांगितले आहे.

४ टर्म आमदार राव दानसिंह

हरियाणा विधानसभेत राव दानसिंह हे महेंद्रगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यावर्ष अखेरीत हरियाणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ४ टर्म आमदार राहिलेले राव दानसिंह यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून भिवानी महेंद्रगड जागेवर निवडणूक लढवली. परंतु भाजपाच्या धर्मबीर सिंह यांनी त्यांचा ४१ हजार मतांनी पराभव केला. 
 

Web Title: 1.42 crore in cash, 32 flats and...; ED raid on Congress Mla Rao Dan Singh house, company, what did they find?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.