बारामती दि २७ (प्रतिनिधी) : बारामती शहरातील दोघा अल्पवयीन मुलांना दुचाकी चोरी प्रकरणी बारामती गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.या दोघांकडुन पोलीसांनी साडेचार लाख रुपये किंमतीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, काटेवाडी(ता.बारामती) परीसरातील एकासह गडशिंदी (ता.माण,ता खटाव,जि.सातारा) येथील १७ वर्षीय युवकांना पोलीसांनी पकडले आहे. २६ जुलै रोजी मराठा मोर्चाच्या पार्श्वभुमीवर शहरात पेट्रोलींग सुरु होते. यावेळी पोलीसांनी इंदापुर चौकात क्रमांक नसलेल्या स्प्लेंडरवरील दोघांना पकडले.पोलीसांनी केलेल्या चौकशीत या दोघांनी १५ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली.या दुचाकी त्यांनी करमाळा,खटाव (जि.सातारा) सह इंदापुर भागात विकल्याची माहिती दिली. पोलीसांनी या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.यामध्ये बारामती शहर—४,वालचंदनगर—१,इंदापुर—१,दौंड—२,सातारा—१,पुणे रेल्वे स्टेशन—१,लोणीकंद—१,जामखेड—१ आदी परीसरातील ३ गाड्यांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.