Gold Smuggling : तामिळनाडूच्या त्रिची विमानतळावर कस्टम विभागाने सिंगापूरहून आणलेल्या सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक केली. या व्यक्ती अशा ठिकाणी सोनं लपवलं होतं की, त्याला पकडणं अवघड होतं. पण नंतर कस्टम विभागाने त्याला पकडलं. या व्यक्तीने त्याच्या अंडरविअरमध्ये पेस्ट बनवून सोनं लपवलं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, व्यक्ती सिंगापूरहून त्रिचीला आला होता. पण कस्टम विभागाने चेकिंग दरम्यान त्याला पकडलं. त्याच्याकडे 24 कॅरेट 301 ग्रॅम सोन्याची पेस्ट सापडली. ज्याची किंमत 15.31 लाख रूपये सांगितली जात आहे. व्यक्तीने सोनं अंडरविअरमध्ये लपवलं होतं. कस्टम विभागाला सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती.
हैराण करणारी बाब म्हणजे तो सिंगापूरहून त्रिचीला पोहोचला. पण यादरम्यान चेकिंगमध्ये तो पकडला गेला नाही.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी केली जात आहे.
याआधी पश्चिम बंगालच्या कोलकातामध्येही सोन्याच्या तस्करीची एक मिळतीजुळती घटना समोर आली होती. कोलकाताच्या विमानतळावर सूडानच्या एका महिलेच्या प्राइवेट पार्ट आणि अंडरविअरमध्ये जवळपास 2 किलो सोनं सापडलं होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी परदेशातून आलेल्या लोकांची झडती घेत असताना या महिलेकडे त्यांना सोनं सापडलं. महिलेच्या अंडरविअरमध्ये एकूण 1,930 ग्रॅम सोनं सापडलं. ज्याची किंमत 96 लाक 12 हजार 446 रूपये इतकी आहे.
पोलिसांनी सांगितलं की, सू़डानची राहणारी महिला लॅमिल अब्देलराजेग शरीफ विमानाने कोलकाता विमानतळावर उतरली होती. कस्टम अधिकाऱ्यांनी तिला चौकशीसाठी बोलवलं. तिचा व्हिसा, पासपोर्ट चेक केला. तिला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. पण अधिकाऱ्यांना तिच्या चालण्यावर संशय आला. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान महिलेने तिच्याकडे सोनं असल्याचं कबूल केलं. महिलेचा झडती घेतली तेव्हा तिच्या प्राइवेट पार्ट आणि अंडरविअरमध्ये जवळपास 2 किलो सोनं सापडलं.