देहूरोड : रावेत येथील शिंदेवस्ती जवळ असलेल्या एका सोसायटीत घुसलेल्या चोरट्यांनी चक्क नंग्या तलवारी नाचवत फ्लॅट फोड़ून पंधरा लाखांचा ऐवज लंपास केला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले आहे. सोसायटीत आलेल्या चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने फ्लॅट फोडले. त्यांच्या हातात तलवारी होत्या. अज्ञात चोरटयांनी एकूण चार सदनिका फोडल्या आहेत. तसेच चोरटयांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शनच तोडून टाकले. त्यांनी चार सदनिकांतील पंधरा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिसांनी संबंधित सोसायटीला भेट देऊन पाहणी केली. आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज पवार यांच्यासह एक पथक या चोरट्यांचा शोध घेत आहे.
रावेतमध्ये घरफोडीत पंधरा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:58 IST