पाकिस्तान - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका अँब्युलन्समध्ये १५ वर्षीय शीख मुलीवर बलात्काराची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी मनोरुग्ण असून ती ननकाना साहिब शहरातील एका गुरुद्वारामधून शनिवारपासून बेपत्ता होती असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गुरुद्वारामधून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ननकाना बायपास येथे एक अँब्युलन्स पहिली. आम्हाला त्या अँब्युलन्समधून एका मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. त्यानंतर आम्ही तात्काळ त्या अँब्युलन्सकडे पोचलो. त्यावेळी दोन आरोपी मुलीचे लैंगिक शोषण करत होते. आरोपींनी दोन किलोमीटर दूर अँब्युलन्स नेवून गाडीबाहेर मुलीचे शोषण करून फेकून पलायन केले.