१६ वर्षाचा नवरदेव अन् ३२ वर्षाच्या नवरीचं लग्न, मुलाच्या वडिलांची पोलिसात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:03 PM2022-05-20T12:03:10+5:302022-05-20T12:14:04+5:30
32 Years old women married to Minor : ही घटना सिंगरौलतील खुटार गावातील आहे. असं सांगितलं जात आहे की, १६ वर्षीय अल्पवयीनचं ३२ वर्षी महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सिंगरौली जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लग्न ३२ वर्षीय महिलेसोबत लावून देण्यात (32 Years old women married to Minor) आलं. अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे आणि गावातील सरपंचावर जबरदस्ती लग्न लावून देण्याचा आरोप केला आहे. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
ही घटना सिंगरौलतील खुटार गावातील आहे. असं सांगितलं जात आहे की, १६ वर्षीय अल्पवयीनचं ३२ वर्षी महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. महिलेने तिच्या पतीला घटस्फोट दिला होता. तेच मुलाच्या वडिलांनी त्याचं लग्न कोयलखुथ गावातील एक मुलीसोबत ठरवलं होतं. हे लग्न १५ मे रोजी होणार होतं. जेव्हा प्रेयसीला आपल्या प्रियकराचं लग्न होणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा ती त्याच्या घरी गेली आणि गोंधळ घातला. प्रकरण इतकं वाढलं की, पंचायतपर्यंत पोहोचलं.
गावातील सरपंचाने प्रेयसी आणि प्रियकराला बोलवलं आणि दोघांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर दोघांच्या सहमतीने दोघांचं लग्न पंचांसमोर लावून दिलं. मुलाचे वडील कमलेश शाह यांनी महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, महिलेचं आधीही दोनदा लग्न झालं आहे. दोन्ही पतींना तिने घटस्फोट दिलाय. त्यानंतर तिचं माझ्या मुलासोबत अफेअर सुरू होतं. सध्या महिला गर्भवती आहे. अल्पवयीन मुलासोबत महिलेचं तिसरं लग्न आहे. तिने माझ्या मुलाला फसवलं आहे.
१६ वर्षाचा नवरदेव आणि ३२ वर्षीय नवरीच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. बाल कल्याण आयोगाने कलेक्टर एसपी आणि महिला बाल विकास अधिकारी सिंगरौली यांना पत्र लिहून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.