नवी मुंबई - महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नवी मुंबई येथून कार्गो पाठवत असताना तब्ब्ल १६ कोटी ८४ लाखांच्या परदेशातील सिगारेट जप्त केल्या आहेत. कार्गोत ४० फुटांचे कंटेनर आढळून आले असून एकूण ९३ लाख ६० हजार सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. ६५० कार्टून्समध्ये इम्पोर्टेड गुडन गरम सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे इम्पोर्टेड सिगारेटने भरलेले कंटेनर असून कार्गो मात्र वॉश बेसिन नावाने होता. डीआरआयने या सिगारेट तस्करीमागील सूत्रधारासह इतर तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.