पिंपरी : बनावट दस्ताऐवज तयार करून सारस्वत बँकेची १६ लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वाती कुलकर्णी (रा. चिंचवड) यांनी आरोपींविरोधात भोसरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. भोसरी पोलिसांनी सोमवारी(दि.२८ जाने.) दोघांविरूद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश सोलंकी,शितल सोलंकी (रा दीघी रस्ता, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत.आरोपींनी त्यांच्या मालकीच्या चऱ्होली , मरकळ रस्ता आळंदी येथील मिळकतीचे बनावट दस्ताऐवज तयार केले. ते खरे आहेत असे भासिवण्याचा प्रयत्न केला. सारस्वत बँकेच्या भोसरी शाखेतून १६ लाख ८० हजार रुपये कर्ज मंजुर करून घेतले. बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी स्वाती कुलकर्णी (रा. चिंचवड) यांनी आरोपींविरोधात भोसरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत बनावट दस्ताऐवजाव्दारे सारस्वत बँकेची १७ लाख ८० हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:11 PM