शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

बँकेचे १७ लाख कर्ज, गहाण जमीन विकली; दोघा भावांवर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Published: January 12, 2024 8:24 PM

या जमीन विक्री प्रकरणात दोन्ही भावंडांवर शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदिया : तालुक्यातील ग्राम उमरी येथील येमेश खोवाराम तुरकर (३७) व रविंद्र खोवाराम तुरकर (३५) यांच्या मालकीची ०.८० हे.आर जमीन २९ जून २०१८ रोजी गोंदियातील दि. यवतमाळ को-ऑपरेटीव्ह बॅंकेकडे १७ लाख रूपयांच गहाण ठेवली होती. परंतु बॅंकेचे कर्ज परतफेड न करताच ती जमीन दुसऱ्याला विक्री करण्यात आली. या जमीन विक्री प्रकरणात दोन्ही भावंडांवर शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०१८ मध्ये येमेश तुरकर व रवींद्र तुरकर यांनी उमरी येथील गट क्रमांक- १४८/१६/क, आराजी ०.८० हेआर. शेत जमिन १७ लाख रूपयात दि. यवतमाळ को-ऑपरेटीव्ह बॅंकेत गहाण ठेवली होती. त्यांनी दरमहा कर्जाचा हप्ता भरला नाही व त्यामुळे त्यांचे कर्ज थकीत झाले होते. अशात बॅंकेकडून थकीत कर्ज वसुली करीता कर्जदारांना वारंवार संपर्क करून थकीत कर्जाचा भरणा बँकेला करण्यास सांगत होते. तुरकर यांचे कर्ज खाते थकीत झाल्याने १३ फेब्रुवारी २०२० बँकेने थकीत कर्ज वसूली करीता महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० व नियम १९६१ नुसार सहनिबंधक, सहसंस्था यांचे मार्फत कर्ज वसुली प्रमाणपत्र प्राप्त केले. 

गहाणखत असलेल्या शेतीचा अद्ययावत ७/१२ त्यांनी ५ जुलै रोजी २०२३ रोजी काढला असता गहाण असलेली शेती कर्जदारांनी कर्जाची परतफेड न करताच व बँकेची कोणतीही परवानगी न घेता कन्हारटोली येथील मीना राजेश सोनवणे (रा. कन्हारटोली, पो. काटी) यांना विक्री केल्याचे उघडकीस आले. परिणामी शाखा व्यवस्थापक पवन नारायण कहारे (४८) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय चन्नावार करीत आहेत.

बॅंकेचे ३३.१२ लाख थकीतरवींद्र तुरकर यांनी बँकेला गहाण ठेवलेली उमरी येथील गट क्रमांक १४८/१६/ब, आराजी ०.८० हेआर. ही शेत जमिन राजेश तेजलाल सोनवणे यांना विक्री केली. कर्जदार व सहकर्जदार या दोघांनी बँकेला गहाण ठेवली. बँकेकडून कर्जाची घेतलेली मुद्दल १७ लाख व त्यावरील व्याज १६ लाख १२ हजार १६३ रूपये असे एकूण ३३ लाख १२ हजार १६३ रुपयाची बँकेची फसवणूक केली आहे.

२५ लाखांचे चेक बाऊन्सरवींद्र तुरकर यांनी बँकेला पाच लाखांचा धनादेश २५ डिसेंबर २०२२ व २० लाखांचा धनादेश २३ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला होता. परंतु त्यांच्या बँक खात्यात पैसे नसल्याने त्यांचा धनादेश वटला नाही. तेव्हा कर्जदारांनी बँकेला थकीत कर्जाचे फक्त एक लाख रुपये जमा केले होते. परिणामी नागपूर येथील विभागीय शाखेने विभागीय बँकेकडून कर्ज वसूली करीता आदेश दिले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी