नवी दिल्ली : लाेन ॲपच्या माध्यमातून कर्ज द्यायचे, लाेकांचा पर्सनल डेटा चाेरून कर्जदारांना ब्लॅकमेल करायचे, अशा ॲप्सवर गुगलने कारवाई केली आहे. प्ले स्टाेरवरून १७ लाेन ॲप्सला हटविण्यात आले आहे. या ॲप्समध्ये मालवेअर आढळला आहे. सायबर सुरक्षा संस्था ‘ईएसईटी’नुसार, अनेक इन्स्टंट लाेन ॲप्स ॲण्ड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. संस्थेच्या अहवालात अशा १८ ॲप्सची यादी दिली हाेती. त्यापैकी १७ ॲप्स हटविण्यात आले आहेत.
हटविले तरीही धाेका तसाचकारवाईपूर्वी हे ॲप्स १.२० काेटी वेळा डाउनलाेड झाले आहेत. ते साेशल मीडिया शेअरिंग किंवा इतर माध्यमातून फसवणूक करीत आहेत.मेक्सिकाे, थायलँड, पाकिस्तान, केनिया, नायजेरिया देशांमधून हे ॲप्स ऑपरेट होतात.
लक्षात ठेवाकर्ज घेण्यापूर्वी संबंधित संस्था व ॲपची आरबीआयकडे नाेंदणी आहे का, हे तपासा. कर्ज देणाऱ्या कंपन्यांना ओळख संख्या ‘सीआयएन’ आणि नाेंदणी प्रमाणपत्र ठळकपणे दाखविणे बंधनकारक आहे.
या ॲपवर कारवाईएए क्रेडिट, आमाेर कॅश, गयाबाकॅश, ईझीक्रेडिट, कॅशवाॅव, केडिबस, फ्लॅशलाेन, प्रेस्टामाॅसक्रेडिटाे, गाे क्रेडिटाे, इन्स्टंटानिओ प्रेस्टामाे, कार्टेरा ग्रँडे, रॅपिडाे क्रेडिटाे, फिनअप लेंडिंग, ४एस कॅशन, ट्रूनायरा, ईझीकॅश.