शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Crime News: १७ वर्षांच्या तरुणीने बॉयफ्रेंडच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि मग घडवून आणले थरकाप उडवणारे कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 16:02 IST

Crime News Update: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नात्यांना काळिमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.

ग्वाल्हेर -  मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नात्यांना काळिमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे एका १७ वर्षांच्या मुलीने प्रियकराच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्या मार्फत आपल्या वडिलांची हत्या घडवून आणली. या तरुणीवर काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी हात उगारला होता. त्यामुळे या तरुणीचा राग अनावर झाला होता. त्यानंतर या तरुणीने क्राईम सिरियल पाहून या हत्याकांडाची योजना आखली. मात्र तिच्या मोबाईलमधील कॉल डिटेलने तिच्या कुकृत्याचे पितळ उघडे पाडले. दरम्यान पोलिसांनी ही तरुणी आणि तरुणाला अटक केली आहे. ( A 17-year-old girl caught her boyfriends Friend in a honeytrap and Caused a trembling act)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ ऑगस्ट रोजी रात्री थाटीपूर पोलिसांना तृप्तीनगरमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय रविदत्त दुबे यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. दुबे हे ग्वाल्हेर कलेक्ट्रेटमध्ये क्लार्क होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर फॉरेंसिक तपासणी करण्यात आली आणि मृतदेहाला पोस्टमार्टेमसाठी पाठवले. घरातील खोलीमध्ये झोपलेले असताना ही हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना कुटुंबीयांवरच संशय होता. पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा मृत रविदत्त यांच्या १७ वर्षांच्या मुलीवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी जेव्हा तिच्या मोबाईलची कॉल डिटेल्स काढली तेव्हा ही अल्पवयीन मुलगी १५ दिवसांपासून एका विशिष्ट्य नंबरच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पोलिसांनी हा नंबर ट्रेस केला असता हा नंबर याच परिसरात राहणाऱ्या पुष्पेंद्रचा असल्याचे दिसून आले. दुसरीकडे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, या तरुणीचे करण राजौरिया नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.

त्यानंतर पोलिसांनी या तरणीच्या प्रियकराची चौकशी केली. त्याच्याकडून पोलिसांनी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या चौकशीनंतर आरोपी अल्पवयीन मुलीचा संयम सुटला आणि  तिने हत्येची बाब उघड केली. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी करण नावाच्या तरुणाला भेटत असे. एकदा रविदत्त यांनी तिला पाहिले होते. त्यानंतर त्यांनी तिला घरी नेऊन तिला मारहाण केली होती. त्यामुळे तिने वडलांचा राग धरला होता. तसेच तिने प्रियकर करण याला वडिलांची हत्या करण्यास सांगितले. मात्र त्याने याला नकार दिला. तसेच तिच्यासोबत असलेले संबंधही संपुष्टात आणले.

त्यानंतर या तरुणीने करणचा मित्र पुष्पेंद्र लोधी याच्याशी मैत्री केली. तिने पुष्पेंद्रला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याला वडिलांची हत्या करण्यासाठी राजी केले. ४ ऑगस्ट रोजी या तरुणीने पुष्पेंद्रला घरी बोलावले. अखेरीस रात्री दोन वाजता पुष्पेंद्रने रविदत्त यांची हत्या केली आणि तिथून पळ काढला. आता थाटीपूर पोलिसांनी ही तरुणी आणि पुष्पेंद्रला बेड्या ठोकल्या आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशFamilyपरिवार