शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका, आठ महिन्यांत १७१३ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 1:54 AM

मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड उकळण्यात आला आहे.शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून होताना दिसत आहे. त्याकरिता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केल्या जात आहेत. त्यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही अंकुश ठेवला जात आहे. मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघात घडून वाहनचालकासह इतर पादचारी अथवा वाहनचालकांच्याही जीविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांचा शोध घेऊन कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार चालू वर्षात मागील आठ महिन्यांत एक हजार ७१३ जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३५० कारवाई जानेवारी महिन्यात केल्या आहेत. त्यामध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाºयांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात जमा झालेली दंडाची रक्कमही सर्वाधिक असून, ती आठ लाख ९०० रुपये इतकी आहे.

वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाहनचालकांमध्ये शिस्त लावण्यासंबंधीच्या न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. तर महाविद्यालयीन तरुणांनाही शिस्तीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे प्रकार शहरात दिसून येत आहेत. अनेकदा त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांसोबतही वाद घातले जातात, त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या मदतीला स्थानिक पोलिसांचाही बंदोबस्त घेतला जात आहे. तर काही महिन्यांपूर्वी बेशिस्त वाहनचालकांचे चालक परवाने रद्द करण्याचीही मोहीम पोलिसांनी राबवली. मात्र, ठरावीक कालावधीनंतर त्यात खंड पडल्याने शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावू शकलेली नाही. परिणामी, चौकाचौकांमध्ये वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचे दर्शन घडत असून, त्यात दुचाकीस्वारांसह रिक्षाचालकांची संख्या मोठी दिसत आहे. मागील दोन वर्षांत शहरातील रस्ते अपघातांच्या संख्येचा आलेख वाढत चालला आहे. २०१७ मध्ये ६२२ अपघात घडले होते, तर २०१८ मध्ये ७६७ रस्ते अपघात घडले आहेत. त्यामागे रस्त्यावरील खड्ड्यांपाठोपाठ मद्यपान करून वाहन चालवल्याचे कारण वेळोवेळी समोर आलेले आहे. यामुळे ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईत सातत्य राखले जाण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हCrime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई