शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

लग्नाच्या वाढदिवस पार्टीत सापडले १८ बांगलादेशी घुसखोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 9:16 AM

गुन्हे शाखेची घणसोलीत कारवाई : रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : घणसोली गावातून १८ बांगलादेशींना अटक झाली असून त्यात १० महिला व ८ पुरुषांचा समावेश आहे. सर्व जण घणसोली व कोपरखैरणे परिसरात राहणारे असून सहकाऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवस पार्टीसाठी बुधवारी रात्री ते एकत्र जमले असता त्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

घणसोली गावातील म्हात्रे आळीमधील मौर्या अपार्टमेंटवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याठिकाणी बांगलादेशी नागरिक एकत्रित जमणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक अतुल आहेर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन केले होते. त्यामध्ये उपनिरीक्षक शरद भरगुडे, सहायक निरीक्षक महेश शेट्ये, नीलम पवार, हवालदार अनिल मांडोळे, गोविंद गोसावी, महेंद्र ठाकूर आदींचा समावेश होता. त्यांनी बुधवारी रात्री ११ च्या सुमारास मौर्या अपार्टमेंटमधील एका घरावर धडक दिली. यामध्ये काही बांगलादेशी महिला व पुरुष हाती लागले. त्यानंतर दुसऱ्या घरातूनही काही बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते मूळचे बांगलादेशचे असून वर्षभरापूर्वी घुसखोरी करून भारतात आल्याचे कबूल केले. तसेच मागील काही महिन्यांपासून ते घणसोली व कोपरखैरणे गावठाण परिसरात राहत होते. बुधवारी त्यांच्या एका सहकाऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी असल्याने तेथे ते एकत्र जमले होते. तेव्हा पाेलिस तेथे पाेहाेचले. त्यांनी तातडीने कारवाई केली.

 घटनास्थळावरून पाेलिसांनी १८ बांगलादेशींना अटक केली असून त्यामध्ये १० महिला व ८ पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर त्यांच्या इतरही सहकाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशNavi Mumbaiनवी मुंबई