मॅगीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून आजी-आजोबा-मामाला दिली, मग प्रियकरासोबत फरार झाली तरूणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:39 AM2023-08-01T10:39:45+5:302023-08-01T10:41:02+5:30

Crime News : तरूणीने मॅगीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून आपली आजी-आजोबा आणि मामा यांना खायला दिली.

18 year old girl gives sleeping pills to her maternal grandparents in maggi and run away with boyfrend in gwalior | मॅगीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून आजी-आजोबा-मामाला दिली, मग प्रियकरासोबत फरार झाली तरूणी

मॅगीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून आजी-आजोबा-मामाला दिली, मग प्रियकरासोबत फरार झाली तरूणी

googlenewsNext

Crime News : ग्वाल्हेरच्या सिरोल भागात एक 18 वर्षाच्या तरूणीने प्रेमासाठी आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकला. पूर्ण परिवाराला बेशुद्ध होण्याचं औषध देऊन ती तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. पोलीस आता तिचा शोध घेण्यासाठी दिल्लीकडे निघाले आहेत.

तरूणीने मॅगीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून आपली आजी-आजोबा आणि मामा यांना खायला दिली. ती पूर्ण परिवाराला बेशुद्ध करून आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. तिचे आजी-आजोब आता व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची स्थिती गंभीर आहे आणि मामाची तब्येत आता बरी आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरूणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सिरोल भागात किशनलाल सखवार आपली पत्नी कंठश्री, 22 वर्षीय मुलगा सोनू आणि नात काजलसोबत राहतात. काजल अंबाहच्या खिरेटा येथील राहणारी आहे. ती तिच्या आजोबांच्या म्हणजे आईच्या वडिलांच्या घरीच राहत होती. तिचं एका बंटी सखवार नावाच्या तरूणासोबत अफेअर सुरू होतं. काजलने प्लान केला आणि मॅगीमधून परिवाराला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर ती बंटीसोबत दिल्लीला पळून गेली. 

काजल आणि बंटीच्या लग्नासाठी परिवार तयार नव्हता. आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी काजलने आजी-आजोबा आणि मामाचा जीव धोक्यात टाकला. काजल तीन वर्षांची असताना पासून आजी-आजोबांकडे राहत होती. अशात तिचं येथील बंटी नावाच्या मुलासोबत सूत जुळलं. पण त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केल असून त्यांच्या शोध घेतला जात आहे. 

Web Title: 18 year old girl gives sleeping pills to her maternal grandparents in maggi and run away with boyfrend in gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.