काँग्रेस नगरसेवकासह १९ जुगाऱ्यांना अटक; जीममध्येच भरविला होता जुगार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 01:36 PM2021-05-27T13:36:25+5:302021-05-27T13:37:09+5:30
19 gamblers arrested including Congress corporator : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : शहरातील आरटीओ ऑफीस मागे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या जीममध्ये जुगार अड्डा चालविला जात होता. याची माहिती शहर ठाण्यातील शोध पथकाला मिळाली. त्यांनी बुधवारी दुपारी सापळा रचून कॉंग्रेस नगरसेवकासह १९ जुगाऱ्यांना अटक केली. घटनास्थळावरून दोन लाख ४४ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
कॉंग्रेस नगरसेवक सलीम शहा सुलेमान शहा (५०) रा. अलकबीरनगर, राजेंद्र भीमराव गुल्हाने (४८) रा. सुकळी, नरेंद्र रामनाथ यादव (६०) रा. बोदड, सलीम शहा गुलाब शहा (४०) रा. सुकळी, आरीफ अहेमद सिद्दीक अहेमद (४२), आसीफ रहीम खान (६२), अशपाक खान मजीद खान (४९) तिघे रा. कळंब चौक, शेख युनुस शेख अब्दूल (५४) रा. शादाब बाग, शेख एजाज शेख हबीब (३६) रा. अलकबीरनगर, मोहंमद जावेद शेख अहेमद (५०) रा. अलकबीरनगर, बबन चंपत भुसारे रा. हादगाव, अमित वसंत नागभीडकर (४५) रा. तारपुरा, सुमीत कैलास पेठकर (४२) रा. पाटीपुरा, अब्दूल कय्युम खान (४४) रा. कुंभारपुरा, शेख इम्रान शेख जाफर (४१) रा. बाबानगर, गुलाब बाबूराव इंगळे (५५) रा. जयभारत चौक, उमेश लक्ष्मण गुरखे (३५) रा. उमरसरा, अनिल शिवचंद चव्हाण (५०) रा. आसोला खुर्द, झायेद शहाद तगाले (३५) रा. गांधी चौक यांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर, एपीआय रामकृष्ण भाकडे, महेश मांगुळकर, अंकुश फेंडर, मिलिंद दरेकर, अमित मस्के यांनी केली.