लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दितून पळविण्यात आलेल्या १९ माेटारसायकलींसह दाेघा चाेरट्यांच्या विशेष पाेलीस पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यात विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दितून माेठ्या प्रमाणावर माेटारसायकली पळविण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पाेलीस पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे लातुरातील वसवाडी येथे सापळा लावण्यात आला. दरम्यान, अविनाश ऊर्फ बापू तानाजी येमगर (२७ रा. रामवाडी ता. जि. उस्मानाबाद), मच्छिंद्र दत्तात्रय क्षीरसागर (२५ रा. किल्लारी ता. औसा ह. मु. वाल्मिकनगर, लातूर) यांना चाेरीतील दाेन माेटारसायकलसह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. दाेघांचीही झाडाझडती घेत अधिक चाैकशी करण्यात आली असता, लातूर, मुरुड आणि औसा पाेलीस ठाण्याच्या हद्दितून माेटारसायकली चाेरल्याची कबुली केली. त्यांच्याकडून १९ माेटारसायकली असा एकूण ११ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आराेपींची अधिक विश्वासात घेत चाैकशी केली असता, तुकाराम मनाेहर कुंभार (रा. हासेगाव ता. औसा), सुनील ऊर्फ बाळा वसंत काळपे (रा. तेर जि. उस्मानाबाद) हे आपले इतर दाेन साथीदार असल्याचे सांगितले. या माेटारसायकली चाैघांच्या टाेळीने चाेरल्याचे समाेर आले आहे. उर्वरित दाेघाच्या अटकेसाठी पाेलीस प्रयत्नशील आहेत.
याबाबत लातुरातील एमआयडीसी, विवेकानंद चाैक, शिवाजीनगर, मुरुड आणि औसा पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. ही कारवाई पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पथकातील पाेलीस उपनिरीक्षक किरण पठारे, सहायक पाेलीस उपनिरीक्षक वाहिद शेख, पाेहेकाॅ. रामचंद्र ढगे, पाे.ना. महेश पारडे, पाे.ना. अभिमन्यू साेनटक्के, पाेकाॅ. गणेश माेरे, पाेकाॅ. साेमनाथ खडके यांनी केली आहे. या टाेळीची व्याप्ती वाढविण्याची शक्यता पाेलीस सूत्रांनी वर्तविली आहे.