एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षीय तरुणाला मुंबईतीलन्यायालयाने जामीन फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्या. सोनाली अग्रवाल यांनी आरोपीचा जामीन अर्ज नाकारला आहे. आरोपी आणि पीडित दोघेही एकाच परिसरात राहतात, त्यामुळे आरोपीची जामिनावर सुटका झाल्यास तो पुराव्याशी छेडछाड करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.सामूहिक बलात्काराची ही घटना ११ मे २०२१ रोजी घडली होती. वास्तविक, १९ वर्षीय आरोपीने त्याच्या मित्राच्या मैत्रिणीला विचारले होते की, तिला ईदसाठी कपडे खरेदी करण्यासाठी सोबत यायचे आहे का? मुलीने होकार दिला. यानंतर आरोपीचे आणखी दोन मित्र आले आणि सर्वजण शिवाजी बाजार येथे गेले, मात्र तेथील दुकाने बंद होती.यानंतर सर्वांनी फिरत फिरत वांद्रे गाठले. १० वाजता ते वांद्र्याच्या समुद्रासमोरील बँड स्टँडवर पोहोचले. दरम्यान, एका आरोपीने महिलेला टेट्रापॉडच्या मागे नेले, तिचे कपडे काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. हे पाहून दुसऱ्या आरोपीनेही तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली.यानंतर मुलीची मैत्रिण तेथे आली, मात्र तिने तिच्या मित्रांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. पीडितेने आरडाओरडा सुरू केल्यावर ते तिला सोडून निघून गेले. यानंतर त्याच्या मित्राने तिला ऑटोरिक्षातून घरी सोडले. या प्रकरणी न्यायमूर्ती म्हणाले, 'हा अतिशय गंभीर आरोप आहे, महिला खरेदीसाठी गेली आणि दोघांनी पीडितेवर बलात्कार केला.'१९ वर्षीय आरोपीच्या वकील मलायका शर्माने युक्तिवाद केला होता की, पीडित मुख्य आरोपीची फक्त मैत्रिण आहे आणि त्याने बलात्कार केला नाही. वकिलाने पुढे सांगितले की, 'पीडित मुलगी रात्री उशिरा घरी पोहोचताच तिच्या बहिणीने तिच्यावर आरडाओरडा केला आणि पालकांनी फटकारल्यानंतर पीडितेने आरोपीने खोटा गुन्हा दाखल केला. मात्र, आई आणि बहिणीचे वक्तव्य पीडितेच्या वक्तव्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ज्या ठिकाणी गँगरेपचा आरोप होत आहे ती जागा अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यापासून जवळ आहे, अशा परिस्थितीत पीडितेच्या किंकाळ्या ऐकूनही कोणी मदतीसाठी का आले नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की, 'वैद्यकीय अहवालात मांड्या आणि शरीराच्या इतर भागात जखमांचा उल्लेख आहे. वैद्यकीय तपासणी अहवाल फिर्यादीच्या केसला समर्थन देतं. त्या आधारे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
महिलेवर गँगरेप करणाऱ्या आरोपींचा जामीन फेटाळला; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 5:12 PM