पूनम अपराज
मुंबई - गुजरातएटीएसने (दहशतवादविरोधी पथक) मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मुसाला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. ही कारवाई काल मुसा दुबईला जात असताना करण्यात आली असल्याची माहिती गुजरातएटीएसचे उपअधीक्षक के. के. पटेल यांनी दिली. पाकिस्तानी पासपोर्ट मुसाकडून हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून १५०० कोटींचे ड्रग्स तस्करीप्रकरणी मुसा गुजरात एटीएसच्या रडारवर होता.
१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या मुसाला मुंबई विमानतळावरून अटक केली. १५०० कोटींच्या ड्रग्स तस्करी करणाऱ्या रॅकेटप्रकरणी तो गेल्या वर्षीपासून गुजरात एटीएसच्या रडारवर होता. आरोपी मुनाफ मुसा याला काल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. तो पाकिस्तानी पासपोर्टद्वारे प्रवास करत होता. तो दुबईला जाण्यासाठी निघाला असताना ही अटकेची कारवाई करण्यात आली. १९९३ मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये मुसा हा आरोपी आहे, या बॉम्बस्फोटात २६० लोकांचा मृत्यू तर आणि ७०० हून अधिक लोकं जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर तो देश सोडून पळून गेला आणि दक्षिण आफ्रिकेत लपला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी गुजरातच्या किनाऱ्यावर ९०० कोटी रुपयांचा ड्रग्स तस्करी केल्याप्रकरणी मुसा गुजरात एटीएसच्या रडारवर होता. ड्रग्स प्रकरणात गुजरात एटीएस त्याच्या भूमिकेची चौकशी करीत आहे, अशी एका अधिकाऱ्याने माहिती दिली.