शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

खड्या पहाऱ्यातून २ कोटीचे केबल चोरीला; गुन्हेशाखेने चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांचे गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:26 PM

१ कोटी ८३ लाखांचे केबल चोरी प्रकरण 

ठळक मुद्देकरमाड पोलिसांची भूमिका संशयास्पदपोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली

करमाड : डीएमआयसीचा विकास करणाऱ्या शेंद्रा परिसरातील शापूरजी पालनजी कंपनीच्या गोडाऊनमधील १ कोटी ८३ लाख रुपये किमतीची अ‍ॅल्युमिनिअम केबल पळविणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडल्यानंतर करमाड पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार पार पाडले. यानंतर आजारी रजा टाकून गायब झालेल्या करमाड ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली.

सुरक्षारक्षकांचा २४ तास खडा पहारा असलेल्या शापूरजी पालनजी कंपनीच्या गोडाऊनमधील १ कोटी ८३ लाख रुपये किमतीची व ४० टन वजनाची अ‍ॅल्युमिनिअम केबल असलेले १९ ड्रम १८ नोव्हेंबर रोजी रात्री पाच ट्रकमधून क्रेनच्या मदतीने पळविण्यात आले. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार नोंदविली नाही. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी सय्यद ऊर्फ पप्पू जमालोद्दीन गफार सय्यद आणि शेख अझहर शेख फतरू  यांना वाळूज परिसरात पकडले होते. तेव्हा त्याने शापूरजी पालनजी कंपनीतून कोट्यवधी रुपये किमतीची केबल चोरी केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी पकडल्याचे समजताच करमाड पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अजिनाथ रायकर यांनी कंपनी व्यवस्थापक वसीम शेख याला बोलावून घेऊन त्याच्याकडून ७ लाख रुपये किमतीची केबल चोरीची फिर्याद लिहून घेतली. यानंतर ते आजारी रजा टाकून गायब झाले आणि शिवाय चार दिवसांपासून त्यांचा मोबाईल बंद आहे. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पो. नि. रायकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात

तडकाफडकी बदली केली.सूत्रांच्या माहितीनुसार भंगार खरेदीचा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास वाळूज येथील एका ट्रान्सपोर्टमधून ५ ट्रकचा वापर करून कंपनीच्या गोडाऊनमधून अ‍ॅल्युमिनिअमची केबल असलेले ड्रम चोरी केले. हे ड्रम उचलण्यासाठी काही पोलिसांनी बीड बायपास रोडवरून क्रेन उपलब्ध करून दिले होते.

दोषींवर कारवाई होईलकोट्यवधी रुपयांच्या केबल चोरीच्या घटनेचा तपास सुरू आहे. यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल. पो. नि. रायकर हे रजेवर गेल्यामुळे करमाड ठाण्याचा कारभार पाहण्यासाठी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक असल्याने पोनि. महेश खेतमाळस यांना तेथे पाठविले. या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईल.    - मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसfraudधोकेबाजी