शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
3
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
4
"मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
5
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
6
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
7
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
8
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
9
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
10
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
11
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
12
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
13
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
14
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
15
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
16
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!
17
'रसगुल्ला'नं संपूर्ण आयुष्य बदललं; एका व्यक्तीनं चक्क कोट्यवधीची संपत्ती कमावली
18
शेवटी आईच ती! ९ महिन्यांच्या बाळाला वाचवलं, स्वत:चं बलिदान दिलं; काळजात चर्र करणारी घटना
19
काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?
20
जगाच्या भुवया उंचावल्या! भारताच्या तीन युद्धनौका इराणला पोहोचल्या; इस्रायल कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असताना...

माझ्या मुलीशी लग्न लावेन, नर्सच्या पतीचा आरोपीशी सौदा; डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 1:05 PM

या आरोपींनी हत्येच्या एक दिवस आधी हॉस्पिटलमध्ये रेकी केली होती असं नर्सिंग होममधील कर्मचारी आबिद यांनी सांगितले.

नवी दिल्ली - शहरातील कालिंदी कुंज परिसरात एका नर्सिंग होममध्ये डॉक्टरची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली. मुख्य आरोपी त्याच्या साथीदारासह रुग्ण बनून हॉस्पिटलमध्ये घुसला होता. विशेष म्हणजे या डॉक्टरला मारण्यासाठी महिला कर्मचाऱ्याच्या पतीने अल्पवयीन आरोपीशी हातमिळवणी करून हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

माहितीनुसार, डॉक्टरची हत्या करण्यासाठी अल्पवयीन आरोपीला आमिष दाखवण्यात आले होते. महिला कर्मचाऱ्याच्या पतीने जर ही हत्या केली तर तुझं माझ्या मुलीशी लग्न लावून देऊ असं आश्वासन दिले. गोळी मारणाऱ्या आरोपीचे हॉस्पिटलमधील महिला स्टाफच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी महिला कर्मचारी आणि तिच्या पतीचीही चौकशी केली. पकडलेला आरोपी अन्य एका साथीदारासह हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्याच्या बहाण्याने घुसला होता. दोन आरोपींपैकी एकाने गोळी चालवण्यापूर्वी कम्पाऊंडरकडून त्याच्या पायाला पट्टी बांधून घेतली होती. त्यानंतर औषध घेण्याचं सांगून दोघे डॉक्टरच्या कॅबिनमध्ये शिरले आणि तिथे डॉ. जावेद अख्तरची गोळी मारून हत्या केली.

मृत डॉक्टर गेल्या २ वर्षापासून नर्सिंग होममध्ये कार्यरत होते, घटनेच्या दिवशी त्यांची ड्युटी रात्री ८ वाजता सुरू झाली होती. त्यावेळी कामावर असलेल्या नर्सिंग स्टाफ गजाला परवीन आणि मोहम्मद कामिल यांनी गोळीबारीचा आवाज ऐकला. त्यानंतर परवीन कॅबिनमध्ये गेली तेव्हा डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले होते. या आरोपींनी हत्येच्या एक दिवस आधी हॉस्पिटलमध्ये रेकी केली होती असं नर्सिंग होममधील कर्मचारी आबिद यांनी सांगितले. या घटनेतील मुख्य आरोपीचं वय १६ वर्ष आहे. हत्येनंतर या आरोपीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या फोटोसह एक कॅप्शन अपलोड करत करून टाकला २०२४ मध्ये मर्डर असा उल्लेख केला आहे.

दरम्यान, डॉक्टरच्या हत्येतील आरोपी एकाच परिसरात राहणारे असून त्यांनी कट रचून ही हत्या केली. त्यातील एकाला हापूड येथून अटक केली. दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक प्रयत्नशील आहे. दोन्ही अल्पवयीन आरोपींनी कम्पाऊंडरकडून ड्रेसिंग करून घेतली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून त्यांची गोळी मारून हत्या केली असं सहपोलीस आयुक्त एसके जैन यांनी सांगितले. त्याशिवाय पकडलेल्या आरोपीने डॉक्टरांच्या पायावर गोळी झाडली होती. त्याचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असं पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी