हुपरी : इसिसशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय (एनआयए) तपास यंत्रणेने आज (रविवारी )पहाटे रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील अंबाबाई नगरात छापा टाकुन दोघा सख्ख्या भावांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. सुमारे पांच तास त्यांच्या घरात झडती सत्र सुरू होते. या दोघांकडे कोल्हापूरात एका ठिकाणी तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. इसिस संदर्भात कनेक्शन यातून समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दहशतवादी कारवायांविरोधात एनआयने रविवारी पहाटे देशभरात १३ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड व कोल्हापूरातील रेंदाळ येथे हे छापे टाकण्यात आले आहेत . संबंधित तरुण हे मुळचे इचलकरंजीचे असुन व्यवसायाच्या निमित्ताने ते हुपरी -रेंदाळ मध्ये वास्तव्यास आहेत. सिल्व्हर चे दागिने तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचे मुंबईशी कनेक्शन असून गेल्या तीन वर्षापासुन त्यानी लब्बैक फाऊंडेशन च्या माध्यमातून सामाजिक uकामाचा बुरखा पांघरुण आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात होते.हे दोघे भाऊ ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या अंबाबाई नगरमधील घरांवर आज पहाटे साडेचार वाजता छापा टाकुन या दोघा भावांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांच्या संपूर्ण घराची झडतीही घेतली. जवळ जवळ पांच तासाच्या झडतीनंतर सकाळी साडेनऊ वाजता त्यांना घेवुन तपास कोल्हापूला रवाना झाले.ही माहिती समजल्या नंतर परिसरात मोठय़ाप्रमाणात खळबळ उडाली आहे.