ठाणे : कर्नाटक येथील १३ आणि १४ वर्षीय सख्या बहिणींना स्वगृही धाडण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले आहे. त्या बहिणी कर्नाटकवरून गुजरात येथे त्यांच्या मोठ्या बहिणी निघाल्या होत्या. त्याचदरम्यान त्या कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या आणि फिरताना रेल्वे पोलिसांनी मिळून आल्या. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्हासनगर बालगृहात दाखल केले होते.
ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पोलीस अमलदारांच्या वॉटस्अप ग्रुपवर पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षेचे मिसिंग पत्र मिळाले. त्यात कर्नाटक,ता. बसवा कल्याण, जिल्हा बिदर येथील १३ वर्षीय आम्रपाली प्रल्हाद हंडीकेरे आणि तिची १४ वर्षीय बहीण सारीका या दोघी उल्हासनगर शासकिय मुलीचे निरीक्षणगृह / विशेषगृह शांतीभवन,येथे असल्याची माहिती मिळावी, त्यानुसार ठाणे चाईल्ड युनिटने भेट देत त्या बहिणींची विचारपूस केली. त्यांना आईवडील नसून त्या भावाकडे राहत असल्याचे सांगितले.
मुलीला मुलं होत नाही म्हणून ५ वर्षीय बालकाचे अपहरण, वृद्ध महिला अटकेत
तेथून त्या बहिणीकडे जाण्यासाठी दोघीच निघाल्या आणि कल्याण स्थानकात उतरल्या. दरम्यान त्यांच्या वहिनीचा मोबाईल नंबर मिळाला. त्या मोबाईल नंबरवरून त्या मुलींच्या भावाशी संपर्क साधला. त्यांची ओळख पटल्यावर त्या दोघींना मंगळवारी भावाच्या ताब्यात दिले.ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव, शामराव कदम, विजय बडगुजर, पोलीस हवालदार सुनिल साळवी, हनुमंत तळेकर, सुधाकर चौधरी, पोलीस नाईक तेजश्री शिरसाठ, पोलीस शिपाई सविता दोंदे, संगिता कांबळे, सुवर्णा यादव या पथकाने केली.