नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मजा, मस्करी करताना फेसबुक लाईव्ह करणं काही जणांना चांगलंच महागात पडलं असून ते त्यांच्या जीवावर बेतलं आहे. 'फेसबुक लाईव्ह' करता करताच होडी उलटल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा अंतर्गत बांसडीह कोतवाली विभागातील मॅरिटार गावाजवळ सुरहा डोहाजवळ ही घटना घडली आहे.
फेसबुक लाईव्ह करताना अचानक होडी उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन तरुणांचा पोहता न आल्याने मृत्यू झाला. या होडीतून सहा तरुण प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरिटार गावातील रहिवासी असलेले सहा तरुण रविवारी दुपारी एक छोटी होडी घेऊन सुरहा डोहातील पाण्यात उतरले होते. होडी चालक नसल्याने तरुण स्वत:च होडी चालवत होते. मौजमजा आणि मस्ती सुरू असतानाच त्यांनी फेसबुक लाईव्ह सुरू केलं. या दरम्यान होडीवरचं त्यांचं नियंत्रण सुटलं आणि होडी पाण्यात उलटली.
होडी उलटल्याने सर्वच तरुण पाण्यात पडले. त्यांनी वाचवण्यासाठी जोरजोरात आरडा-ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेल्या काही मच्छीमारांनी आपला जीव धोक्यात टाकत या तरुणांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या आणि सहाही तरुणांना पाण्यातून बाहेर काढलं. मात्र यातील दोन तरुणांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. पण दोन्ही तरुणांना मृत घोषित करण्यात आलं. मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणांची नावं अनुज गुप्ता आणि दीपक गुप्ता अशी आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संतापजनक! 20 वर्षीय तरुणीवर भाजपा पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला सामूहिक बलात्कार
मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपा (BJP) पदाधिकाऱ्यासह चार जणांनी सामूहिक बलात्कार (Rape) केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहडोल जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष कमल प्रताप सिंह यांनी याप्रकरणी विजय त्रिपाठीचं (Vijay Tripathi) नाम समोर आल्यानंतर तात्काळ त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. सोबतच पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चारही आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.