शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

बाभूळगावच्या व्यापाऱ्याची २० लाखांची बॅग लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 12:37 PM

crime News : बाभूळगाव येथील एका सराफा व्यापाऱ्याची २० लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. 

यवतमाळ : बाभूळगाव येथील एका सराफा व्यापाऱ्याची २० लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. बाभूळगाव येथील सराफा व्यापारी सुरेश पारसमल वर्मा गुरुवारी नेहमीप्रमाणे बॅग घेऊन आपल्या घरुन शिवाजी चौक स्थित दुकानात आले. दुकानाचे कुलूप उघडत असताना कुलूपला घाण लागून असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळील बॅग तेथेच ठेवली. क्षणार्धात चोरट्यांनी ही बॅग लंपास केली. या बॅगमध्ये तब्बल रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण २० लाखांचा मुद्देमाल असल्याचे सांगितले जाते. याबाबत त्वरित पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, पाच-सहा वर्षांपूर्वीही सराफा व्यावसायिक सुरेश वर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी ते नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून बॅगमध्ये दागिने टाकून घरी पोहोचले होते. ऐन घराजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. मात्र शेजारी धावून आल्याने हल्लेखोर अंधाराचा लाभ घेत पळून गेले होते. त्यानंतर वर्मा यांनी दुकानातच तिजोरी तयार करून त्यातच दागिने ठेवण्यास सुरुवात केली होती. आता जवळपास पाच-सहा वर्षानंतर पुन्हा त्यांची बॅग चोरीला गेली. या घटनेने बाभूळगावच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ