मेदिनीनगर (पलामू) - झारखंडमध्ये चोरीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. पलामूच्या मेदिनीनगर पोलीस ठाण्याच्यामागे असलेल्या मोठ्या तलावाजवळ २० डुक्कर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्व २० डुक्करांना एका व्यक्तीने त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. भुक्ताबेगी लक्ष्मी डोम नावाच्या व्यक्तीने शहर पोलिस ठाण्यात चोरीसंबंधी गुन्हा दाखल केला आहे. बिहारमधील गया जिल्ह्यामधील शेरघाटी येथून चोरी झालेल्या डुक्करांपैकी चार डुक्कर जप्त करण्यात आले आहेत. आता पलामू पोलीस शेरघाटी येथे डुक्करांना आणण्यासाठी जात आहेत. लक्ष्मीने तिच्या शेजार्याच्या सुनेवर चोरीचा आरोप केला आहे.चोरीच्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक नकुल शाह यांनी सांगितले की, पोलीस बिहारमध्ये डुक्करांना आणण्यासाठी आणि या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. लक्ष्मी डोम यांनी सांगितले की, २४ मार्चच्या रात्री डुक्करांना त्यांचा वाडा तोडण्यात आला. लक्ष्मीने तिच्या शेजारी राहणाऱ्या लंगटु डोमचा जावई राजा डोम याच्यावर चोरीचा आरोप केला आहे. बिहारमधील गया येथील शेरघाटी येथून चार डुक्करांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे डुक्कर शेरघाटी पोलिस ठाण्यात आहेत. असे म्हटले जाते की, लक्ष्मी डोमने हुंडा म्हणून तिच्या मुलीच्या लग्नासाठी डुक्करांना ठेवले होते.मे महिन्यात मुलीचे लग्न झाले आहे. चोरी करणारा राजा हा बिहारमधील शेरघाटीचा रहिवासी आहे. पलामू एसपी संजीव कुमार म्हणाले की, मेदिनीनगरमध्ये डुक्कर चोरीचे प्रकरण समोर आले आहे. पोलिस तिथे जाऊन या प्रकरणाची चौकशी करतील.
मुलीच्या लग्नात द्यायला ठेवलेल्या २० डुक्करांची झाली चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 9:44 PM
Robbery Case : आता पलामू पोलीस शेरघाटी येथे डुक्करांना आणण्यासाठी जात आहेत. लक्ष्मीने तिच्या शेजार्याच्या सुनेवर चोरीचा आरोप केला आहे.
ठळक मुद्देबिहारमधील गया येथील शेरघाटी येथून चार डुक्करांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे डुक्कर शेरघाटी पोलिस ठाण्यात आहेत.