मुंबई: वडील आणि आजोबांची हत्या करून २० वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडली आहे. शार्दुल मिलिंद मांगले असं तरुणाचं नाव आहे. शार्दुलनं वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. त्यानं वडील आणि आजोबांची हत्या का केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. (20 year old commits suicide by killing father grandfather)मांगले यांच्या घरी वडील आणि आजोबांची देखभाल करण्यासाठी केअर टेकर ठेवण्यात आला होता. सकाळी साडे आठच्या सुमारास केअर टेकर वडिलांना चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेला असताना शार्दुलनं वडिलांवर चाकूनं सपासप वार केले. शार्दुलनं केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेले वडील ओरडले. जोराचा आवाज आल्यानं केअर टेकर किचनमधून बाहेर आला. तेव्हा शार्दुल त्याला वडिलांवर वार करताना दिसला.
VIDEO: वडील, आजोबांची हत्या करून तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 1:33 PM