200 महिलांना ऑनलाइन गलिच्छ मेसेज पाठवणाऱ्या आणि अश्लील फोटो व्हिडिओ पाठवणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीपोलिसांनीअटक केली आहे. मनोज कुमार असे या ऑनलाइन स्टॉकरचे नाव आहे. मनोज कुमार हा कारखान्यात कामगार आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि दोन सिमकार्डही पोलिसांनी जप्त केले आहेत.दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एका महिलेने तक्रार केली की, काही दिवसांपासून कोणीतरी तिच्या ऑनलाइन पेजवर अश्लील मेसेज पाठवत आहे. एवढेच नाही तर ती व्यक्ती आता व्हॉट्सअॅपवर कॉल आणि अश्लील मेसेज पाठवत आहे. महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी प्रथम सर्व सोशल मीडिया नेटवर्कवरून आरोपींची माहिती घेतली. यानंतर आरोपी ज्या नंबरवरून कॉल करत असे त्याचे कॉल डिटेल्सही काढण्यात आले आणि त्याच्या कॉल डिटेल्सची कसून चौकशी करण्यात आली.पोलिसांनी बहादूरगड येथून पकडलेप्रथम पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. आरोपी हा बहादूरगड हरियाणाचा रहिवासी असून तेथील ज्यूस कारखान्यात काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 15 जून रोजी सापळा रचून आरोपी मनोज कुमार याला बहादूरगड येथून अटक केली. पोलिसांनी मनोजकडून 2 सिम असलेला मोबाईल जप्त केला. या फोनच्या तपासात पोलिसांना अनेक अश्लील मेसेज आणि व्हिडिओही दिसले, जे तो अनेक महिलांच्या नंबरवर पाठवत असे.पत्नीसोबत आरोपीचे वाद सुरूचौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याचे त्याच्या पत्नीसोबत भांडण होत होते, त्यानंतर त्याने सोशल मीडियावर अशाच महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर मेसेजिंग आणि कॉलिंग अॅपद्वारे फोन करून महिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अशाप्रकारे किमान 200 महिलांशी ऑनलाइन स्टॉकिंग केली आहे.