डोंबिवली-डोंबिवलीतील महात्मा फुले रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केल्याने एटीएममधील २१ लाखाची रोकड जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी करण्यात आला आहे. या घटनेचा तपास विष्णूनगर पोलिसांनी सुरु केला आहे.
कल्याण डोंबिवलीत घरफाेडी आणि चोरीच्या घटना सुरु आहे. पोलिसांकडून अनेक चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. मोठा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थित कल्याण डोंबिवलीतील नागरीकांना तीन कोटी ५५ लााख रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. हे सर्व सुरु असताना डाेंबिवली एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. मध्य रात्री चोरट्यांनी या एटीएममध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडून एटीएम फुटत नसल्याने त्यांनी त्यांच्याजवळील गॅस कटरचा वापर सुरु केला. कटरने एटीएम मशीन कट करीत असताना गॅसमुळे मशीनला आग लागली. या आगीत मशीनमधील २१ लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. पोलिसाना माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. ज्या ठिकाणी एटीएम मशीन होते. त्याठिकाणी चोरट्यांनी मशीन कट करण्यासाठी गॅस सिलिंडर आणला होताा. तो सिलिंडर त्याच ठिकाणी चोरटे टाकून पळाले आहे. तसेच चोरी करताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे चोरट्यांचा तपास लावणे पोलिसांपुढे आव्हान आहे. एटीएम मशीनच्या ठिकाणचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी चोरी केला असला तरी आसपासच्या दुकानासमोर आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिस या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.