मुंबई - राजधानी मुंबईत जेवढी प्रसिद्ध आहे, तेवढीच गुन्हेगारी घटनांसाठी कुप्रसिद्धही आहे. त्यामुळेच मुंबई पोलीस नेहमीच हाय अलर्टवर असतात. आपल्या सावधगिरीने ते गुन्हेगारी क्षेत्रावर दबदबा ठेवून आहेत. तरीही, गुन्हेगार मुंबईत ड्रग्ज, हत्यारे, चरस, गांजा यांसारख्या वस्तूंची विक्री करतानाचे दिसून येते. मुंबई पोलिसांनी नुकतेच एका गुन्हेगाराला अटक केली आहे. विशेष म्हणजे 21 वर्षीय तरुणाकडे तब्बल 10 पिस्तुल आढळून आल्या आहेत.
मुंबईतील मुलुंड भागात 21 वर्षीय तरुण पिस्तुल विक्रीसाठी आल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांचमधील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 10 बंदुका आणि 12 मॅगझीन जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचे नाव लखनसिंह असून तो मध्य प्रदेशचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. लखनसिंगचे कुटुंब शस्त्रास्त्र बनविण्याच्या धंद्यात असल्याचंही त्याच्या चौकशीतून समोर आलं आहे. त्यावरुन, तो मुंबईत ही शस्त्रे विकण्यासाठीच आला होता, असा अंदाज व्यक्त होत आहे.
डोंबिवलीत मोबाईल चोरट्यांना बेड्या
मुंबईकडे येणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चोरट्यांकडून एक्सप्रेसमध्ये चोरीचे 11 मोबाईल पोलिसांनी हस्तगत करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पोलिस ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे त्यांचा शोध घेत आहेत, जेणेकरुन त्यांना मोबाईल देता येईल